07 March 2021

News Flash

जॉन अब्राहमकडून चाहत्याच्या कानशिलात?

याआधीही जॉनने एका छायाचित्रकाराला हटकले होते

जॉन अब्राहम

‘फोर्स २’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. पण या चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच अभिनेता जॉन अब्राहम एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. जॉनने त्याच्या एका चाहत्याच्या कानशिलात लगावल्याचे वृत्त समोर आले आहे. चाहत्याने जॉनचा दंड धरत त्याला सेल्फी काढण्यासाठी खेचले तेव्हा त्याने चाहत्याच्या कानशिलात लगावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण जॉनने मात्र या बातमीचे खंडन केले. त्यामुळे यामागचे सत्य जाणून घेण्यासाठी अनेकांनाच उत्सुकता लागली आहे.

याआधीसुद्धा एका छायाचित्रकाराने जॉनचे फोटो काढण्यासाठी कॅमेरा धरला असताना त्याने छायाचित्रकाराला धमकावले होते. पण नुकत्याच पार पडलेल्या एका ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात चाहत्याने जॉनचा टी-शर्ट खेचण्याचा प्रयत्न केला. चाहत्याने जॉनला खेचण्यास सुरुवात करताच त्याने चाहत्याला दूर सारले आणि तो थेट गाडीत जाऊन बसला. हा सारा प्रकार प्रसारमाध्यामांसमोर उघड होताच जॉनच्या प्रवक्त्यांनी त्याच्या बचाव पक्षात बोलण्यास सुरुवात केली. ‘जॉन त्याच्या चाहत्याला जाणूनबुजून दुखावणार नाही. याउलट त्या चाहत्यानेच स्वत: जॉनची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत सदर प्रकरणी आपल्या गैरवर्तनाबद्दल माफी मागितली आहे’, असे जॉनचे प्रवक्ते म्हणाले.

दरम्यान चित्रपटाच्या ट्रेलरच्या अनावरण सोहळ्यामध्ये जॉनला भारतीय सेनेने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’बद्दलही विचारण्यात आले. तेव्हा, ‘ही देशाने दहशतवादाला उत्तर देण्याची वेळ आहे. ही फारच गर्वाची गोष्ट आहे, हे सर्व आधीच व्हायला हवे होते. एक राष्ट्र म्हणून आपण फारच सहनशील भूमिका घेत होतो’, असे म्हणत जॉनने त्याचे मत मांडले.
जॉन सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहे. अभिनय देव दिग्दर्शित ‘फोर्स २’ हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘फोर्स’चा सिक्वल आहे. जिथे ‘फोर्स’ चित्रपटाची कथा संपली होती. तिथूनच ‘फोर्स २’ ची कथा सुरु होईल असे म्हटले जातेय. या चित्रपटात ती एका ‘रॉ एजन्ट’ची भूमिका साकारत आहे. जॉन अब्राहमने ‘फोर्स २’ चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरवर शेअर केला आहे. नुकताच चित्रपटाचा पोस्टरही प्रदर्शित करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 4:33 pm

Web Title: did john abraham slap a fan heres what he has to say
Next Stories
1 अमृता सिंगला अनिल कपूर का घाबरतोय?
2 ते कलाकार आहेत, दहशतवादी नाहीत- सलमान खान
3 शाहिद कपूरच्या नावावर कास्टिंग काउचचा प्रयत्न
Just Now!
X