26 February 2021

News Flash

वयाच्या ४२व्या वर्षी ‘कसौटी जिंदगी की’मधील अभिनेता अडकणार लग्न बंधनात?

जाणून घ्या त्याच्या विषयी...

टीव्ही क्वीन एकता कपूरच्या हिट मालिकांपैकी ‘कसौटा जिंदगी की’ ही मालिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. या मालिकेने अनेकांची मने जिंकली होती. या मालिकेतील अनुराग बासू म्हणजे सीजेन खान आणि प्रेरणा म्हणजे श्वेता तिवारी यांची जोडी त्यावेळी हिट ठरली होती. ते सर्वांचे लाडके कपल होते. आता सीजेन वयाच्या ४२व्या वर्षी लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर सीजेनचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. एकेकाळी देखण्या कलाकारांच्या यादीमध्ये सहभागी असलेल्या सीजेनचे सोशल मीडियावरील फोटो पाहून त्याला ओळखणे देखील कठिण झाले आहे. सीजेनने अद्याप लग्न केलेले नाही. आता तो वयाच्या ४२व्या वर्षी गर्लफ्रेंडशी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सीजेनच्या गर्लफ्रेंडचे नाव अद्याप समोर आलेले नाही. तो २०२०मध्येच लग्न करणार होता पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्याने लग्नाचा प्लॅन पुढे ढकला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सीजेनने नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याला बिग बॉस १४ची ऑफर आली असल्याचे म्हटले. पण यंदाच्या सीझनमध्ये सहभागी होण्याची त्याची इच्छा नसल्याने त्याने नकार दिला असे तो म्हणाला.

सीजनने कसौटी जिंदगी की या मालिकेनंतर काही पाकिस्तानी मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने ‘पिया के घर जाना है’, ‘सिलसिले चाहत’ या मालिकांमध्ये काम केले. पण गेल्या काही दिवसांपासून तो इंडस्ट्रीपासून लांब असल्याचे पाहायला मिळते. सीजेन दुबईमध्ये राहत असल्याचे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 2:43 pm

Web Title: did kasautii zindagii kay fame anurag basu aka cezanne khan getting married avb 95
Next Stories
1 पहिल्यांदाच शोमध्ये बंद झाला एक्सपर्टचा आवाज, अमिताभ बच्चन यांनी लढवली अनोखी शक्कल
2 बच्चन पांडेसाठी अक्षय कुमारचा राऊडी लूक; फोटो पाहून व्हाल चकित
3 सैफने रावणाविषयी केलेल्या वक्तव्यावर ‘आदिपुरुष’च्या संवाद लेखकाने मांडले मत
Just Now!
X