11 December 2017

News Flash

नेहा धूपियाकडून सुशांत आणि किर्तीच्या नात्यावर शिक्कामोर्तब?

मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने या दोघांच्या नातेसंबंधांचा खुलासा केला

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 13, 2017 2:28 PM

नेहा धूपिया, क्रिती सेनन आणि सुशांत सिंग राजपूत

हे आतापर्यंत सर्वांनाच माहित आहे की नेहा धूपिया ‘नो फिल्टर विथ नेहा’ या नावाच्या शोचे सूत्रसंचालन करते. नेहाने या शोमधून बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्याबद्दल एक खुलासा केला आहे. आम्ही दुसऱ्या कोणाबद्दल बोलत नसून सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सेननबद्दल बोलतोय. या दोघांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले आहे. अनेकदा त्यांना त्यांच्या नात्याबद्दल विचारण्यातही आले. पण त्यांनी कधीच याबद्दल खुलासा केला नाही. पण नेहाने मात्र याचा खुलासा केला आहे. नेहाने ‘ग्राझिया’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने या दोघांच्या नातेसंबंधांचा खुलासा केला आहे.

येत्या दिवसांत एवढी कमाई करेल अक्षयचा ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’

त्याचे झाले असे की, मासिकाने नेहाला रॅपिड फायरचे काही प्रश्न विचारले. यातील एक प्रश्न असा होता की, ‘अशी एखादी अफवा सांग जी खरी आहे’ या प्रश्नाचं उत्तर देताना नेहाने सुशांत आणि क्रितीचं नाव घेत म्हटलं की, ‘हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.’ आता नेहा हे सगळं मस्करीमध्ये बोलत होती की खरं आहे हे काही माहित नाही. पण तिच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सुशांत आणि क्रितीच्या अफेअरच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या हे मात्र खरंय.आता या सगळ्यावर सुशांत आणि क्रिती काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

सुशांतने क्रितीसाठी अंकिता लोखंडेशी ब्रेकअप केले होते अशा चर्चा तेव्हा रंगत होत्या. पण आजही हे दोघं आम्ही फक्त चांगले मित्रच आहोत असं सगळीकडे सांगताना दिसतात. दोघांचा पास आओ ना या व्हिडिओमध्ये शेवटचे एकत्र पाहण्यात आले होते. त्यांचा राबता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही तरी त्यांच्या नात्यावर याचा काही परिणाम झाला नाही.

‘भूमी’ सिनेमातील सनी लिओनीच्या डान्सची झलक पाहिली का?

काही दिवसांपूर्वी एका ड्रायव्हरला सुशांतने शिवीगाळ केली होती. गोरेगाव येथील फिल्मसिटी येथून जाताना दुसऱ्या गाडीच्या ड्रायव्हरने सुशांतच्या गाडीला ओव्हरटेक करत यू- टर्न घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या अशा वागण्यावर सुशांत चांगलाच संतापला होता आणि त्याने त्या ड्रायव्हरला शिवीगाळ केली होती.

First Published on August 13, 2017 2:28 pm

Web Title: did neha dhupia just confirm kriti sanon and sushant singh rajput relationship