21 September 2020

News Flash

प्रदीप पटवर्धन “मोरूच्या मावशी”ची तिकिटं ब्लॅकमध्ये विकायचे?

"सुधीर भटांकडून जी काही मिळतिल ती पाच तिकिट दहा तिकिटं प्रदीप पटवर्धन घ्यायचा नी ब्लॅक करायचा"

केदार शिंदे, भरत जाधव व प्रदीप पटवर्धन अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमात

मोरूची मावशी नाटक यशाच्या शिखरावर असताना प्रसिद्ध अभिनेता प्रदीप पटवर्धन हा नाटकाची तिकिटं ब्लॅकनं विकायचा अशी पुढी अभिनेता व पटवर्धनांचा खास दोस्त विजय पाटकर यांनी सोडली आहे. कलर्सच्या अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमात पाहुणे असलेल्या पटवर्धनांच्या आठवणी चित्रफितीच्या माध्यमातून पाटकरांनी जागवल्या आणि आपल्या या दोस्ताची अवस्था भर शोमध्ये केविलवाणी केली. सध्या अत्यंत लोकप्रिय झालेल्या व मकरंद अनासपुरे सादर करत असलेल्या या शोच्या गुरूवारच्या भागात हा रंजक किस्सा दाखवण्यात आला.

विजय पाटकरांनी तर पटवर्धन कसे रंगेल होते याचेही दाखले दिले. आम्हाला अजूनही एक बायको सांभाळता येत नाही, पट्या मात्र रिसेसला एक, कॉलेज सुटल्यावर वेगळी, नाटकाच्या रिहर्सलला वेगळी, पिकनिकला आणखी वेगळी व जिथं राहतो तिथंही वेगळी इतकी अकाउंट सांभाळायचा. पाटकरांनी हे सांगितल्यावर पटवर्धनांनी तर हात जोडले आणि अरे हा काय भलतंच सांगतोय, असं काही नव्हतं अशी आपली बाजू सांभाळायचा प्रयत्न केला. हे कमी की काय म्हणून पाटकरांनी आणखी एक पिल्लू सोडलं.

पाटकर म्हणाले, “प्रदीपची आणखी एक क्वालिटी म्हणजे बिझिनेस माइंडेड.. म्हणजे बघा ना त्या काळात मोरूची मावशी हाऊस फुल्ल चालत होतं. सुधीर भटांकडून जी काही मिळतिल ती पाच तिकिट दहा तिकिटं तो घ्यायचा नी ब्लॅक करायचा.. नाटकाची नाईट नी वर हे वरचे पैसे…
कुठल्या नटाला हे सुचेल सांगा. कुठला नट तिकिट घेईल नी ब्लॅक करेल,” असं सांगत पाटकरांनी पटवर्धनांची अवस्था केविलवाणी केली.
सगळे मनमुराद हसता असताना पटवर्धन मात्र, हे खोडायचं कसं याच विचारात होते. मकरंद अनासपुरे, केदार शिंदे व भरत जाधव यांनीही पाटकरांनी सांगितलेल्या या किश्शाला जोरदार हसत दाद दिली.

पटवर्धन मात्र, अरे मी कशाला तिकिटं ब्लॅक करीन, चांगली नोकरी करत होतो मी, मला काय तिकिटं ब्लॅक करायची गरज असं सांगत आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला.. “माझ्या एंट्रीनं मोरूची मावशी नाटक सुरू होतं, तर मी तिथं एंट्री घेऊ का खालती तिकिटं ब्लॅकमध्ये विकत बसू,” असं सांगत पाटकर खेचत असल्याचं सगळ्यांच्या गळी उतरवायचा प्रयत्न पटवर्धनांनी केला. अत्यंत निखळ करमणुकीच्या या कार्यक्रमात मकरंद अनासपुरेंच्या खुसखुशीत सूत्रसंचालनामुळे चांगलीच रंगत येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 1:32 pm

Web Title: did pradeep patwardhan sell drama tickets in black
Next Stories
1 ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
2 #URITeaser : ‘ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर मे घुसेगा भी और मारेगा भी’
3 #SuiDhaaga : जाणून घ्या, सुई धागा पाहण्यामागची ‘ही’ पाच कारणे
Just Now!
X