20 October 2020

News Flash

‘बिग बॉस १४’साठी सलमान घेणार इतके मानधन?

जाणून घ्या रक्कम

पण याचा सलमानच्या करिअरवर परिणाम झाला नाही. आज सलमानचे चित्रपट १०० कोटींहून अधिक कमाई करताना दिसतात.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. या रिअॅलिटी शोचे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करतना दिसतो. त्यामुळे चाहत्यांमध्ये शोबाबत उत्सकुता पाहायला मिळते. आता ऑक्टोबर महिन्यात बिग बॉस १४ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सीझनच्या फॉरमॅटमध्ये थोडे बदल करण्यात आल्याचे म्हटले जात आहेत. अशातच शोसाठी सलमान किती मानधन घेणार असा ही प्रश्न अनेकांना पडला आहे.

बिग बॉस पर्व १४साठी सलमान खान जवळपास २५० कोटी रुपये मानधन घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बिग बॉसचे पर्व १३ हिट ठरले होते. त्यामुळे या सीझन बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. तसेच करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शोमध्ये काही तरी वेगळे पाहायला मिळणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमिवर मालिकांच्या आणि चित्रपटांच्या चित्रीकरणास परवानगी देण्यात आली. मात्र त्यासाठी काही नियम तयार करण्यात आले. त्यामुळे या नियामांचे पालन करत बिग बॉसचे चित्रीकरण सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच शोचे चित्रीकरण ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 1:12 pm

Web Title: did salman khan charging 250 cr for bigg boss season 14 avb 95
Next Stories
1 ‘रिया एक मोहरा आहे. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार….’, बॉलिवूड दिग्दर्शकाचे खळबळजनक ट्विट
2 “शूटिंगला परवानगी देण्यापूर्वी कलाकारांची ड्रग्स टेस्ट करा”; कंगना रणौतची केंद्राला विनंती
3 ‘किंग ऑफ वकांडा’ काळाच्या पडद्याआड; ‘अमुल’ची ब्लॅक पँथरला अनोखी श्रद्धांजली
Just Now!
X