17 October 2019

News Flash

किसिंग सीनमुळे सलमानने घेतला ‘ईन्शाल्ला’मधून काढता पाय?

हा सीन 'या' अभिनेत्रीसोबत चित्रीत करायचा होता

सलमान खान

‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात सलमाननं संजय लीला भन्साळींसोबत काम केलं होतं. त्यानंतर या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. या चित्रपटानंतर १९ वर्षांचा काळ लोटला पण दिग्दर्शक भन्साळी आणि सलमानची जोडी काही एकत्र काम करताना पाहायला मिळाली नाही. मात्र इतक्या वर्षांनंतर भन्साळींच्या ‘ईन्शाल्ला’ या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याच चर्चा होती. परंतु आता सलमानने या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या माहितीनुसार, ‘ईन्शाल्ला’ हा चित्रपट २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट आणि सलमान खान मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. मात्र आता ऐनवेळी सलमानने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. सलमान त्याच्या कोणत्याही चित्रपटामध्ये किसिंग सीन देत नाही. मात्र असं असतानादेखील ईन्शाल्लामध्ये त्याचा एक किसिंग आहे. त्यामुळेच त्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. मात्र प्रत्यक्षात हे कारण नसून अन्य एका कारणामुळे त्याने काम करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार संजय लिला भन्साळी यांनी काही दिवसापूर्वी अभिनेता हृतिक रोशनची भेट घेतली होती. त्यामुळे या चित्रपटामध्ये आता हृतिक झळकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र याविषयी चित्रपटाच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

First Published on September 16, 2019 3:25 pm

Web Title: did salman khan refuse to kiss alia bhatt in film inshallah ssj 93