News Flash

सनी लिओनीचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला; म्हणाली…

सनीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कंगना रणौत, सनी लिओनी

बॉलिवूडमधील ड्रग्सच्या मुद्द्यावरून अभिनेत्री कंगना रणौत आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांदरम्यान कंगनाने गुरुवारी तिचं मत मांडत असताना अभिनेत्री सनी लिओनीचं उदाहरण दिलं. स्त्रीवादावर मत मांडताना कंगनाने सनीवर टिप्पणी केली. त्यावरून आता सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कंगनाला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

कंगनाने उर्मिला मातोंडकर यांना उत्तर देताना स्त्रीवादाच्या मुद्द्यावरून ट्विटरवर म्हटलं, ‘सनी लिओनीला आपला आदर्श मानू नये असं म्हणणाऱ्या एका प्रसिद्ध लेखकाची उदारमतवाद्यांनी व्हर्च्युअल लिंचिंग केली होती. सनीला इंडस्ट्रीने आणि भारताने एक कलाकार म्हणून स्वीकारलं. आता अचानक फेमिनिझमला पाठिंबा देणाऱ्यांना पॉर्न स्टार असणं फार अपमानजनक वाटतंय .’

कंगनाच्या या ट्विटला सनीने सोशल मीडियावर अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं. सनीने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला. त्यासोबतच दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘हे खूप मजेशीर आहे की ज्या लोकांना तुमच्याबद्दल फार कमी माहिती असते तेच लोक तुमच्याबद्दल सर्वांत जास्त बोलतात.’ सनीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा- बॉलिवूड विरोधातील वादात कंगनाने केला ‘सनी लिओनी’चा उल्लेख; म्हणाली…

कंगनाने उर्मिला मातोंडकर यांना सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिच्यावर टीका केली. तर उर्मिला यांनी मला जेव्हा प्रॉस्टिट्युट म्हटलं होतं तेव्हा फेमिनिझम कुठे गेला होता, असा सवाल कंगनाने नेटकऱ्यांना विचारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 5:08 pm

Web Title: did sunny leone take an indirect dig at kangana ranaut ssv 92
Next Stories
1 सौंदर्याचं कारस्थान येणार का कार्तिकसमोर?
2 जावेद अख्तर नव्हे, तर ‘या’ अभिनेत्याला होती शबाना आझमींची पहिली पसंती
3 सुशांतला आगळीवेगळी श्रद्धांजली; चाहत्याने तयार केला मेणाचा पुतळा
Just Now!
X