30 November 2020

News Flash

तापसीचा रियाला पाठिंबा? ट्विट चर्चेत

तापसीने संताप व्यक्त केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु असून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. तसेच या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने ट्विट करत रियाला पाठिंबा दिला आहे.

तापसीने अभिनेत्री लक्ष्मी मानचूच्या ट्विटला रिट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने लोकांना कायद्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले आहे. मी सुशांत किंवा रियाला वैयक्तीक पातळीवर ओळखत नव्हते. पण एक माणूस म्हणून आपल्याला समजायला हवे एखादा व्यक्ती कायद्याने दोषी सिद्ध झाला नसतानाही आपण त्याला दोषी ठरवणे चुकीचे आहे या आशयाचे ट्विट करत तापसीने संताप व्यक्त केला आहे. तसेच तापसीचे हे ट्विट पाहून अनेकांनी तापसीने रियाला पाठींबा दिला असल्याचे म्हटले आहे.

१४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. त्यानंतर सुशांतचे वडिलांनी सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार केली. आता या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. तसेच दररोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 2:40 pm

Web Title: did taapsee pannu supports rhea chakravarti avb 95
Next Stories
1 बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे अभिनेत्री झाली ट्रोल, घेतला ‘हा’ निर्णय
2 अभिनेता सुबोध भावे आणि कुटुंबाला करोनाची लागण
3 कंगना रणौतच्या लोकप्रियतेला उतरती कळा?; दिवसाला ५० हजार फॉलोअर्स करतायत अनफॉलो
Just Now!
X