News Flash

दूरदर्शनवरील ‘या’ मालिकेतून करण जोहरने केली होती अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात

पाहा त्या मालिकेचा व्हिडीओ..

सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय चित्रपट निर्माता म्हणून करण जोहर ओळखला जातो. आज २५ मे रोजी करणचा ४८वा वाढदिवस आहे. लॉकडाउनमुळे यंदाचा वाढदिवस करण कुटुंबीयांसोबत साजरा करणार असल्याचे दिसत आहे. आज अनेक हिट चित्रपटांची निर्माती करणाऱ्या करण जोहरने बाल कलाकार म्हणून काम केले होते. चला जाणून घेऊया करण विषयी काही खास गोष्टी..

अनेकांना करण जोहरने ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटामध्ये सहाय्यक कलाकार म्हणून काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याचे माहित आहे. पण किती लोकांना हे माहित आहे की करण जोहरने दूरदर्शन वाहिनीवरील एका मालिकेत बाल कलाकार म्हणून काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

On Karan Johar’s birthday, here is something unknown about him.

A post shared by Latest Bollywood Videos (@bollywoodlatestvideos) on

करणने १९८९ साली दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या इंद्रधनुष्य या मालिकेत बाल कलाकार म्हणून काम केले आहे. य़ा मालिकेसंदर्भात करणने साजिद खान आणि रितेश देशमुखच्या ‘यारों की बारात’ या शोमध्ये वक्तव्य केले होते. त्यावेळी त्याने वयाच्या १४व्या वर्षी या मालिकेत बाल कलाकार म्हणून काम केले होते. पण त्यावेळी काही कारणास्तव मालिकेचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते.

‘जेव्हा मालिका प्रदर्शित झाली तेव्हा मी १८ वर्षांचा होतो. पण मी १४ वर्षांचा असताना केलेल्या गोष्टींमुळे १८व्या वर्षी माझे रॅगिंग केले होते आणि ते चुकीचे होते’ असे त्याने म्हटले होते.

इंद्रधनुष्य या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन आनंद महेंद्रू यांनी केली होती. ही मालिका लहान मुलांवर आधिरित होती. करण जोहरने या मालिकेत श्रीकांत हे पात्र साकारले होते. या मालिकेनंतर त्याने ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात सहाय्यक कलाकार म्हणून काम केले. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये त्यानी भूमिका साकारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 1:54 pm

Web Title: did you know karan johar made his acting debut with a doordarshan show avb 95
Next Stories
1 कंगनाचं पाली हिल येथील आलिशान ऑफिस; पाहा व्हिडीओ
2 “मला दारुच्या दुकानापर्यंत नेऊन सोड”, अशी विनंती करणाऱ्याला सोनू सुद म्हणाला…
3 विकास खन्नामुळे गरजुंची ईद झाली खास; २ लाख बांधवांना पुरवलं अन्नधान्य
Just Now!
X