पतौडी या शाही कुटुंबातील जवळपास सगळेच सदस्य बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहेत. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, सैफ अली खान, सोहा अली खान, सारा अली खान, इब्राहिम अली खान, करीना कपूर यांचा समावेश आहे. पण तुम्हाला माहिती आहे का सैफची आणखी एक बहिण आहे जी बॉलिवूडपासून लांब आहे. तिचे नाव सबा अली खान असे असून ती बिझनेस करते.
सबा एक ज्वेलरी डिझायनर आहे. तिचा जन्म मुंबईमध्ये झाला. तिने दिल्लीमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने ज्वेलरी डिझाइनचे पुढचे शिक्षण अमेरिकेत घेतले आहे. सबाने लहानपणापासूनच लाइमलाइट पासून दूर राहण्याचे ठरवले होते. त्यामुळे आज फार कमी लोकांना माहित आहे की सैफ आणि सोहाला आणखी एक बहिण आहे.
करिनाचं आलिशान सासर : ८०० कोटींचा पतौडी पॅलेस आतून कसा दिसतो पाहिलात का?
सोहा अली खानचे आलिशान घर, पाहा फोटो
सबा एक ज्वेलरी डिझायनर म्हणून लोकप्रिय आहे. तसेच तिचे स्वत:चे डायमंड रेंज आहे. तिने करीना कपूरची ज्वेलरी डिझाइन केली आहेत. सबाही ४४ वर्षांची आहे. तिने अद्याप लग्न केलेले नाही.
एका मुलाखतीमध्ये सबाने कधीच चित्रपटांमध्ये काम करण्याचा विचार केला नसल्याचे सांगितले. सबा अली खान ही बॉलिवूडपासून लांब असली तरी ती कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे. बिझनेस टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार सबाकडे जवळपास २७०० हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 5, 2020 7:52 pm