जेव्हा कोणत्याही लोकप्रिय आणि महान माणसाच्या जीवनावर आधारित एखादा बायोपिक बनवला जातो तेव्हा प्रेक्षकांना माहिती नसलेली सगळी माहिती त्यांना कळते. अनेकदा ही कथा त्यांच्या व्यक्तिमत्वा बद्दल सांगते. काही वेळा दिग्दर्शक चित्रपट मनोरंजक बनवण्यासाठी काल्पनिक सीन तयार करतात.  ‘शेरशाह’ देखील एक बायोपिक आहे.  हा चित्रपट कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. हा चित्रपट १२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांनी पसंती मिळताना दिसत आहे. तसंच हा भारतातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का यातील एक सीन काल्पनिक होता?

‘शेरशाह’या चित्रपटाद्वारे १९९९ सालातील कारगीलच्या युद्धात विक्रम बत्रा यांनी दिलेल्या बलिदानाला मानवंदना देण्यात आली आहे. आपले ‘शेरशाह’हे नाव सार्थ करत कॅप्टन बत्रा यांनी दिलेला साहसी लढा आणि शेवटी केलेले बलिदान भारताच्या विजयामध्ये महत्त्वाचे ठरले होते. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे. पॉइंट ५१४० काबिज केल्यावर विक्रम बत्रा जेव्हा खालती बेसला परततात तेव्हा चित्रपटात असे दाखवण्यात आले आहे की ते त्यांच्या प्रेयसीला फोन करून ही बातमी देतात. मात्र खऱ्या आयुष्यात हा फोन ते प्रेयसीला केलेला नाही.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा

कारगीलच्या पहिल्या युद्धात पहिला पॉइंट काबिज केल्यावर कॅप्टन विक्रम बत्रा यांनी त्यांच्या प्रेयसीला नाही तर त्यांच्या वडिलांना जे अल बत्रा यांना फोन केला होता. विक्रम बत्रा यांच्या वडिलांनी एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, “विक्रमने फोन केल्यावर त्याचं पहिलं वाक्य होतं Daddy I have captured (बाबा मी तो पॉइंट काबिज केला). सॅटेलाईट फोन असल्याकारणाने मला नीट कळंल नाही. मला वाटलं की विक्रमला शत्रूने बंदिस्त बनवले आहे. मात्र मग मी विचार केला की जर का विक्रमला बंदी बनवण्यात आलं असतं तर तो माझ्याशी बोलू शकला नसता. म्हणून मी विक्रमला शुभेच्छा दिल्या आणि पुढील कामगिरीसाठी ऑल द बेस्ट बोललो.” या चित्रपटात विक्रम डिंपल यांना फोन करतात. जरी हा सीन जरी काल्पनिक असला तरी त्या कथेमध्ये तो चपखल बसला आहे की कुठेही हा सीन काल्पनिक असल्याचा भास होतं नाही.

विष्णु वर्धन दिग्दर्शित ‘शेरशाह ‘या चित्रपटाचे चित्रीकरण, त्यातील असलेले संवाद, कलाकारांचा अभिनय याला प्रेक्षक आणि क्रिटीक्स कडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अॅमेझॉन प्राइमवरील या चित्रपटाला आयएमडिबीवर १० पैकी ८.९ रेटिंग मिळाले असून ६४,००० आयएमडिबी युजर्सने या चित्रपटासाठी वोट केलं आहे. तसंच हा चित्रपट या आठवड्यातील आयएमडिबी प्रो, मूव्ही मिटरवर टॉप १० ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.