भारताचे महान माजी धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे १८ जून रोजी निधन झाले. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. २०१३ मध्ये मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट देखील ठरला होता. पण या बायोपिकसाठी मिल्खा सिंग यांनी केवळ एक रुपया मानधनापोटी घेतला होता.

‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर आणि सोनम कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले होते. बऱ्याचदा अनेक प्रसिद्ध व्यक्ती हे बायोपिकसाठी कोट्यावधी रुपये मानधनापोटी घेतात. पण राकेश यांचा ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट त्याला अपवाद ठरला. मिल्खा सिंग यांनी चित्रपटासाठी केवळ १ रुपया मानधनापोटी घेतला होता. ही एक रुपयाची नोट १९५८ सालची होती. याच वर्षी कॉमनवेल्थ स्पर्धेत मिल्खा सिंग यांनी पहिले सुवर्ण पदक पटकावले होते.

film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
Song from the movie Jaga Char Diwas produced by Jagruti Entertainment news
‘जगा चार दिवस’ चित्रपटाचा गीत ध्वनिमुद्रणाने मुहूर्त..
Suhani Bhatnagar
‘डरमॅटोमायोसायटिस’ आजार आहे तरी काय? ज्यामुळे ‘दंगल’गर्ल सुहानी भटनागरचे निधन
Shivrayancha Chhava Movie Review
Shivrayancha Chhava Movie Review : अतिरंजक शौर्यगाथा

आणखी वाचा : ‘मी हे स्विकारायलाच तयार नाहीये’; मिल्खा सिंग यांच्या निधनाने फरहान अख्तर भावूक

दरम्यान, मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंग यांना दाखल करण्यात आले होते. करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली. आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिल्खा सिंग यांच्या मृत्यूची बातमी कळताच देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. बॉलिवूडमधील अभिनेता फरहान अख्तर याने देखील एक पोस्ट शेअर करत मिल्खा सिंग यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलंय.