05 December 2020

News Flash

‘कल हो ना हो’मधील बालकलाकार आता असा दिसतो, पाहा फोटो..

प्रितीच्या लहान भावाची भूमिका साकारलेल्या या मराठमोळ्या मुलाचे नाव आहे अथित नाईक. 

अथित नाईक

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान, डिंपल गर्ल प्रिती झिंटा आणि नवाब सैफ अली खान यांचा ‘कल हो ना हो’ हा सिनेमा आठवतोय का? या सिनेमात प्रिती झिंटाचा जो छोटा भाऊ दाखवलेला तो आठवतो का? या बालकलाकाराने तेव्हा सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. प्रितीच्या लहान भावाची भूमिका साकारलेल्या या मराठमोळ्या मुलाचे नाव आहे अथित नाईक.

अथित नाईक आता मोठ झाला आहे. सध्या त्याचे इन्स्टाग्रामवरचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. खरेतर भारतीय हॅरी पॉटर म्हणून अथितला ओळखले जाते. मुंबईचा हा मराठमोळा मुलगा आता सिनेसृष्टीत पडद्यामागे सिनेमॅटोग्राफीचे काम करतोय. विशेष म्हणजे ६७ व्या ‘फेस्टिव्हल द कान्स’मध्ये त्याच्या दोन लघुपटांची निवड झाली होती. जगभरातल्या फिल्ममेकर्ससाठी हा फेस्टिव्हल अतिशय मानाचा समजला जातो. अनेकदा सिनेमाचे चित्रिकरण करताना ट्रॉलीवर कॅमेरा ठेवला जातो. मात्र अथितने त्याच्या लघुपटांचे चित्रिकरण हातात कॅमेरा धरुन केले होते.
अथितने लॉस एंजेलिसमध्ये फिल्ममेकिंगचे शिक्षण घेतले आहे.

आणखी वाचा : ‘शंकरा रे शंकरा’; अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित

जेमी फॉक्ससारख्या अनेक बड्या सेलिब्रिटींच्या म्युझिक व्हिडिओजसाठी त्याने सिनेमॅटोग्राफी केली आहे. बालकलाकार म्हणून अथितने २ टीव्ही शो, ७ बॉलिवूड सिनेमे आणि १७२ जाहिरातींमध्ये काम केले आहे. ‘कल हो ना हो’ सिनेमा रिलीज होऊन नुकतीच १६ वर्षे उलटली आहेत. अथित जरी आता सिनेमॅटोग्राफी करीत असला तरी त्याला बॉलिवूडचे दरवाजे अजूनही खुले आहेत. त्यामुळेच जर तो एखाद्या बॉलिवूड सिनेमात किंवा परत एकदा एखाद्या जाहिरातीमध्ये दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 1:03 pm

Web Title: did you recognize this child artist from kal ho na ho ssv 92
Next Stories
1 प्रसिद्ध अभिनेत्याला ३३व्या वर्षीच करावी लागली आजोबाची भूमिका
2 मादक भूमिकांच्या ऑफर का येतात? राधिकाने सांगितले कारण
3 तापसीने साजरा केला मितालीचा वाढदिवस, दिलं खास गिफ्ट
Just Now!
X