13 August 2020

News Flash

ऋषी कपूरचे आगळे रूप!

ऋषी कपूर यांच्या ‘लूक’ची चर्चा बॉलीवूडमध्ये सुरू झाली आहे.

प्रत्येक कलाकाराला आपल्या अभिनय प्रवासाच्या कारकीर्दीत वेगळ्या प्रकारची भूमिका आणि वेगळ्या प्रकारच्या ‘लूक’मध्ये दिसण्याची इच्छा असते. कलाकार तशा संधीच्या शोधातही असतात. बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर वेगळ्या रूपात येण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना ऋषी कपूर यांचा वेगळा ‘लूक’ पाहायला मिळणार असून या भूमिकेच्या रंगभूषेसाठी त्यांना तब्बल पाच तास इतका वेळ लागत आहे.

दस्तुरखुद्द ऋषी कपूर यांनी ‘ट्विटर’वरून याबाबत माहिती दिली असून चित्रपटासाठी रंगभूषा करतानाचे एक छायाचित्रही चाहत्यांसाठी सादर केले आहे. चित्रपटात ऋषी कपूर यांच्या रंगभूषेचे काम आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध रंगभूषाकार ग्रेग कॅनम करत आहेत. हा चित्रपट येत्या मार्च महिन्यात प्रदर्शित होणार असला तरी यातील ऋषी कपूर यांच्या ‘लूक’ची चर्चा बॉलीवूडमध्ये सुरू झाली आहे.

चित्रपटाची निर्मिती करण जोहर यांची असून ऋषी कपूर यांच्यासह चित्रपटात आलिया भट्ट, फवाद खान, सिद्धार्थ मल्होत्रा हे कलाकार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2016 2:35 am

Web Title: different look of rishi kapoor in upcoming movie kapoor and sons
टॅग Rishi Kapoor
Next Stories
1 ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ चित्रपट
2 शिंदे पिता-पुत्र म्हणतायत ‘आवाज वाढव डीजे, तुला आईची शप्पथ हाय!’
3 ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात ‘आईस वॉटर’ लघुपटाची बाजी
Just Now!
X