News Flash

मोराजवळ जाऊन फोटो काढणे अभिनेत्रीला पडले महागात, पाहा व्हिडीओ

सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे दिगांगना सूर्यवंशी. सध्या सोशल मीडियावर दिगांगनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका मोराच्या बाजूला उभी असल्याचे दिसत आहे. पण जवळ जाताच त्याने तिच्यावर हल्ला केला आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिगांगनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मोराला पाहून आनंदी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान ती हळूहळू मोराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि अचानक तो मोर तिच्यावर हल्ला करतो. त्यानंतर दिगांगना घाबरते आणि तिच्या हाताला किरकोळ दुखापत झाल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : ‘माझी फुलकोबी…’, अजब फोटोशूटमुळे अभिनेत्री झाली ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सध्या दिगांगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये दिगांगनाने मोरपिसी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यामुळे एका यूजरने कमेंट करत ‘मोर अभिनेत्रीला म्हणतो हा तर माझा रंग आहे. तुझी हिंमत कशी झाली या रंगाचे कपडे घालायची’ अशी कमेंट करत हसण्याचे इमोजी वापरले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

दिगांगनाने बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. ती ‘बिग बॉस ९’ या रिअॅलिटीशोमध्ये सहभागी झाली होती. तिला ‘एक वीर की अरदास… वीरा’ या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. तिने ‘जलेबी’ आणि ‘फ्रायडे’ या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ती लवकरच अर्जुन रामपालच्या ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 1:35 pm

Web Title: digangana suryavanshi attacked by a peacock video viral avb 95
Next Stories
1 ‘भूलभूलैय्या-२’ चे दिग्दर्शक अडकलेत लॉकडाऊनच्या भूलभूलैय्यात!
2 समलैंगिक संबंधावर आधारित ‘हिज स्टोरी’ पोस्टर प्रकरणी एकता कपूरने मागितली माफी
3 गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणार ज्योतिबाचा भव्य राज्याभिषेक सोहळा
Just Now!
X