News Flash

‘घरात १० दिवस बंद राहून पाहा मग कळेल’; ‘बिग बॉस’ स्पर्धक ट्रोलर्सवर संतापली

अभिनेत्रीने बिग बॉस ट्रोलर्सला दिलं जोरदार प्रत्युत्तर

‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. या रिअॅलिटी शोमध्ये खेळले जाणारे टास्क, स्पर्धकांची भाषा, त्यांची भांडण यावर अनेकदा टीका देखील केली जाते. दरम्यान या सर्व टीकाकारांना अभिनेत्री दिगांगना सुर्यवंशी हिने प्रत्युत्तर दिलं आहे. “घरात बसून बिग बॉसमधील स्पर्धकांवर टीका करणं सोपं आहे, पण एखाद्या घरात १० दिवस बंद राहून पाहा मग तुम्हाला त्या कलाकारांच्या मानसिक स्थितीचा अंदाज येईल.” असा टोला तिने ट्रोलर्सला लगावला आहे.

अवश्य पाहा – ‘बेजबाबदार सिद्धार्थमुळे एलिमिनेट झाले’; ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच अभिनेत्री संतापली

दिगांगना ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. बिग बॉसच्या ९व्या सीझनमध्ये ती झळकली होती. अलिकडेच आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत तिने बिग बॉस स्पर्धकांची स्तुती केली. ती म्हणाली, “बिग बॉस हा पाहायला सोपा पण खेळायला अत्यंत कठीण असा शो आहे. एखाद्या घरात १०० दिवस बंद राहाणं सोप काम नाही. हा शो स्पर्धकांच्या मानसिक स्थितीची परिक्षा घेतो. तरी देखील काही मंडळी बिग बॉसवर टीका करतात. या सर्व टीकाकारांनी किमान १० दिवस एखाद्या घरात बंद राहून पाहावे मग त्यांना बिग बॉसमधील कलाकारांच्या मानसिक स्थितीचा अंदाज येईल. अर्थात ज्या प्रेक्षकांना हा शो आवडत नाही त्यांनी टीका करावी परंतु टीका करताना त्यांनी अश्लिल शब्दांचा वापर करु नये ही अपेक्षा आहे.”

अवश्य पाहा – “हृतिकने अंघोळ करुच नये”; कियाराने व्यक्त केली अनोखी इच्छा

‘बिग बॉस’च्या १४ व्या सीझनला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. हा शो सुरु होऊन आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. शोमधील प्रत्येक स्पर्धक मोठ्या जिद्दीने ‘बिग बॉस’च्या घरात टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सिद्धार्थ शुक्ला, हिना खान गौहर खान आणि सारा गुरपाल यांना मात्र शोमध्ये दिर्घ काळ टिकून राहता आलं नाही. तीसऱ्याच आठवड्यात हे चार स्पर्धक ‘बिग बॉस’मधून एलिमिनेट झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 1:23 pm

Web Title: digangana suryavanshi bigg boss 14 mppg 94
Next Stories
1 Video : अभिनेता महेश कोठारेंची ‘धडाकेबाज’ मुलाखत
2 या प्रसिद्ध अभिनेत्रीला करोनाची लागण; शोमधील कलाकारही झाले होम क्वारंटाइन
3 टायगर श्रॉफचं वर्कआऊट पाहून व्हाल थक्क; फिट राहण्यासाठी करतो ‘ही’ मेहनत
Just Now!
X