07 August 2020

News Flash

‘दिल बेचारा’च्या पॅकअपचा दिवस; सुशांतचा व्हिडीओ आला समोर

सुशांतचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांची मनं जिंकतोय.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ येत्या २४ जुलै रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. यासोबतच शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पॅकअपच्या दिवशी सुशांत कसा होता, हे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

ज्या ठिकाणी ‘दिल बेचारा’ चित्रपटाची शूटिंग सुरू होती, तिथे लोकांनी सुशांतला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पॅकअपनंतर सुशांत त्याच्या टीमसोबत जात होता, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. एकीकडे सुशांतला पाहण्यासाठी जमा झालेली लोकांची गर्दी आणि त्यांच्यासमोरून हात जोडून नमस्कार करत अत्यंत विनम्रतेने येणारा सुशांतचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांची मनं जिंकतोय.

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर त्याचे अनेक जुने फोटो, व्हिडीओ दररोज व्हायरल होत आहेत. ‘दिल बेचारा’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्याच्यासोबत संजना सांघीने मुख्य भूमिका साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 11:23 am

Web Title: dil bechara pack up day sushant singh rajput video viral ssv 92
Next Stories
1 सोनू सूदच्या मदतीला विमानाचा वेग! किर्गिस्तानमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थ्यांना आणलं मायदेशी
2 ‘तेव्हा माझ्यावर देश सोडायची वेळ आलेली, पण….’; रणवीर शौरीने सांगितला ‘तो’ अनुभव
3 ३० वर्षीय अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी सुरू केली चौकशी
Just Now!
X