News Flash

Video : “दिल बेचारा” म्यूझिक ट्रॅक व्हिडीओद्वारे ए आर रहमानने वाहिली सुशांतला श्रद्धांजली

श्रेया घोशाल, सुनिधी चौहान, अमिताभ भट्टाचार्या असे अनेक गायक सहभागी झाले आहेत.

‘दिल बेचारा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी म्यूझिक कंपोझर आणि गायक ए आर रहमानने बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला गाण्यातून श्रद्धांजली वाहिली आहे. त्यासाठी त्यांनी ‘दिल बेचारा’ या चित्रपटाच्या म्यूझिक ट्रॅकचा वापर केला असून हा व्हिडीओ यूट्यूबर प्रदर्शित केला आहे.

या १३ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय गायक वेगवेगळ्या ठिकाणाहून सहभागी झाल्याचे दिसत आहे. कोणी मुंबईमधून शूट केलं आहे तर कोणी कॅनडा. ए आर रहमान, श्रेया घोशाल, सुनिधी चौहान, अमिताभ भट्टाचार्या, मोहित चौहान, हृदय गट्टानी आणि जोनिता गांधी यांनी या व्हिडीओमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांनी चित्रपटातील तारे गिने, खुलके जिने का, फ्रेंडझोन आणि मसखरी हे गाणे गायले आहे. तसेच या व्हिडीओमध्ये सुशांतच्या काही खास आठवणी शेअर करण्यात आल्या आहेत.

मुकेश छाब्रा दिग्दर्शित ‘दिल बेचारा’ या चित्रपटात सुशांत मुख्य भूमिकेत आहे. तसेच अभिनेत्री संजना सांघी ही सुशांतसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संजना या चित्रपटाच्या निमित्ताने कलाविश्वात पदार्पण करणार आहे. तसेच अभिनेता सैफ अली खानदेखील या चित्रपटात पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे जुलै २०१८मध्ये चित्रीकरण सुरु झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच हा चित्रपट जॉन ग्रीक यांच्या ‘द फॉल्ट इन आवर स्टार्स’ या पुस्तकावर आधारित असल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 5:46 pm

Web Title: dil bechara team pays musical tribute to sushant singh rajput ar rahman shreya ghoshal sunidhi chauhan perform songs avb 95
Next Stories
1 सलमान खान करतोय ‘वर्क फ्रॉम होम’; ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यास दिला नकार
2 थलायवाने आलिशान लॅम्बॉर्गिनी चालवली, सोशल मीडियावर चाहते सुसाट
3 ख्रिस्तोफर नोलनला करोनाचा फटका; वर्षातील सर्वात मोठा चित्रपट तिसऱ्यांदा लांबणीवर
Just Now!
X