News Flash

हे काय? या मराठी अभिनेत्रीने केक खाण्याऐवजी लावला चेहरा आणि अंगाला

ओळखलंत का या अभिनेत्रीला?

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेतील ‘निशा’ आठवतेय का? राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेली ही निशा, म्हणजेच मंजिरी पुपालाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ख्रिसमसच्या निमित्ताने मंजिरीने हा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.

‘केक आणि सेलिब्रेशनचा सध्या माहौल असल्याने, तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी हा फोटो अतिशय योग्य वाटतोय’, असं म्हणत तिने हा फोटो पोस्ट केला. मंजिरीने तिच्या पूर्ण चेहऱ्याला आणि अंगाला हा केक लावला आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय. मंजिरीच्या या फोटोवर ‘भाडिपा’ फेम सारंग साठ्येनेही कमेंट केली आहे. ‘कॉलेजमध्ये प्रत्येक वाढदिवसाला मला असा केक फासला जायचा. कॉलेजमधली पोरं पैसे जमा करून केक आणायचे आणि तो चेहऱ्याला फासायचे’, अशी आठवण सारंगने सांगितली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjiri Pupala (@manjiripupala)

आणखी वाचा- देवमाणूस मालिकेचे १०० भाग पूर्ण; सेटवर सेलिब्रेशन

यापूर्वी मंजिरीने हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये काम केले असून, ‘ग्रहण’ मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. मंजिरीने स्टार प्लस वाहिनीवरील ‘इश्कबाज’ या मालिकेत एसीपी अदिती देशमुखची भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 10:07 am

Web Title: dil dosti duniyadari fame actress manjiri pupala applied cake all over the face ssv 92
Next Stories
1 ‘सँडविच फॉरेव्‍हर’मध्‍ये दिसणार अतुल कुलकर्णीची विनोदी शैली
2 रजनीकांत यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
3 गोविंदाला आळशीपणा पडला महागात?; अनुराग बासूनं चित्रपटातून केलं बाहेर
Just Now!
X