18 January 2021

News Flash

‘जेठालाल’ने शेअर केला २६ वर्षांपूर्वीचा फोटो, म्हणाले..

सध्या त्यांचा हा फोटो चर्चेत आहे..

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका सध्याच्या अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा चर्चेत असतो. अनेकदा जेठालाल हे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी दिलीप यांनी चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी इन्स्टाग्रामवर पदार्पण केले. आता त्यांनी इन्स्टाग्रामवर २६ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केल्यामुळे चर्चा रंगल्या आहेत.

दिलीप जोशी यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत छान असे कॅप्शन दिले आहे. ‘जरा हटके (१९९४, झी टीव्ही) पहिल्यांदाच मला लीडिंग मालिकेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ते सुद्धा या अतिशय चांगल्या व्यक्तीसोबत. मी स्वत:ला भाग्यवान समजेन की मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि सेटवर त्यांची गाणी ऐकायला मिळाली’ असे दिलीप यांनी फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे.

दिलीप यांनी शेअर केलेला फोट्यामध्ये ते तरुण दिसत आहेत. तसेच त्यांच्यासोबत लकी अली हे लोकप्रिय म्यूझिक कंपोजर दिसत आहे. लकी अली आणि दिलीप हे खूप चांगले मित्र असल्याचे दिसत आहे. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 7:48 pm

Web Title: dilip joshi shares old photo avb 95
Next Stories
1 पार्थ समथान करणार आलिया भट्टसोबत काम?
2 “अद्याप खूनाचा आरोप सिद्ध झालेला नाही”; कुब्रा सैतचा रियाला भक्कम पाठिंबा
3 Video : ‘बिना पायल के ही बजे घुंघरू’वर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स
Just Now!
X