News Flash

दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

दिलीपकुमार यांना शनिवारी पहाटे श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Dilip Kumar

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना गुरूवारी सकाळी लीलावती रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पत्नी सायरा बानू आणि नातेवाईक त्यांना घरी नेत असताना रूग्णालयाबाहेर त्यांच्या चाहत्यांची गर्दी जमली होती. यावेळी दिलीप कुमार प्रसन्न मुद्रेने चाहत्यांना सामोरे गेले. सायरा बानू यांनी या चाहत्यांचे आभार मानले.

प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांना गुरुवारी घरी जाण्यास परवानगी देण्यात आली. त्यांना झालेला संसर्ग कमी झाला असून श्‍वासोच्छ्वासही पूर्ववत झाला आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्‍टर जलील पारकर यांनी दिली. दिलीपकुमार यांना शनिवारी पहाटे श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2016 1:47 pm

Web Title: dilip kumar discharged from lilavati hospital see pic
Next Stories
1 विद्या बालन साकारणार ‘बेगम जान’
2 ‘धुम-४’ मध्ये सलमान खान साकारणार खलनायक?
3 पाहाः ‘सैराट’मधील ‘याडं लागलं ग याडं लागलं गं’चा नवा व्हिडिओ
Just Now!
X