ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना न्युमोनिया झाला असून त्याच्या उपचारासाठी रविवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली.

‘काल रात्री दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्युमोनियामुळे त्यांना पुन्हा एकदा दाखल करण्यात आले. त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करा,’ अशी माहिती ट्विटरवर देण्यात आली.

५ सप्टेंबर रोजी त्यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी १४ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. पण ते पूर्णपणे बरे झाले नव्हते. डिस्चार्जनंतर दिलीप कुमार यांना जेवण व औषधं ही नळीवाटे दिली जात होती. दिलीप कुमार हे ९५ वर्षांचे आहेत.