28 May 2020

News Flash

दिलीप कुमार यांचे पाकिस्तानमधील घर राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित

दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांचे पाकिस्तानमधील घर राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे.

| July 14, 2014 11:02 am

दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांचे पाकिस्तानमधील घर राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मोडकळीस आलेल्या या मालमत्तेस राष्ट्रीय वारसा घोषित करण्याचे आदेश दिले. शरीफ यांच्या या निर्णयामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यास चालना मिळू शकते.
दिलीप कुमार यांच्या घराला राष्ट्रीय वारसा घोषित केल्यानंतर सरकारने त्याचे रुपांतरण संग्रहालयामध्ये करण्याचा विचार केला आहे. दिलीप यांचे घर पेशावर येथील प्रसिद्ध किसा खावानी बाजार येथे आहे. यासंबंधित समारंभासाठी दिलीप कुमार व त्यांच्या कुटूंबियांना आमंत्रित करण्यात येणार आहे. युसूफ खान म्हणजेच दिलीप कुमार यांचा जन्म १९३० साली पेशावर येथे झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2014 11:02 am

Web Title: dilip kumars ancestral home in pakistan declared national heritage
Next Stories
1 पाहाः सोनम कपूरच्या ‘खुबसूरत’चा टीझर पोस्टर
2 पाहाः डेव्हिल सलमान आणि नरगिसचे ‘यार ना मिले’ गाणे
3 ‘बिग बॉस’च्या सूत्रसंचालनासाठी शाहरुख योग्य- सलमान
Just Now!
X