24 September 2020

News Flash

मानलेल्या मुलाने घेतली दिलीप कुमार यांची भेट

सध्या दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर

छाया सौजन्य- ट्विटर

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार गेल्या काही दिवसांपासून आजारपणामुळे रुग्णालयात दाखल झाले होते. पण, काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल केल्यापासूनच चाहत्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली होती. यामध्ये काही सेलिब्रिटींचाही समावेश होता. काही दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर दिलीप कुमार ज्यावेळी घरी परतले तेव्हा अनेकांनीच त्यांच्या परतण्याचा आनंद सोशल मीडियावरुन व्यक्त केला.

या महान अभिनेत्याची भेट घेण्यासाठी अनेकांनीच त्यांच्या घराची वाट धरली. यामधीलच एक नाव म्हणजे अभिनेता शाहरुख खान. दिलीप कुमार यांचा मानलेला मुलगा म्हणून ओळखला जाणाऱ्या शाहरुखने मंगळवारी त्यांच्या राहत्या घरी जाऊन प्रकृतीविषयी विचारणा केली. दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन खुद्द सायरा बानो यांनीच ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली. ‘त्यांच्या मानलेल्या मुलाने म्हणजेच शाहरुखने त्यांची भेट घेतली. त्यावेळचेच हे काही फोटो…’, असं ट्विट करत त्यांनी काही फोटोही पोस्ट केले.

वाचा : शब्दांच्या पलिकडले : ‘ओ मेहबूबा… ओ मेहबूबा… मेरे दिल के पास’

ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये शाहरुख मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने दिलीप कुमार यांना अंथरुणात बसवत असल्याचं पाहायला मिळत आहे. वाढतं वय आणि त्यामुळे ओढवणारे आजार यांमुळे दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली होती. पण, सध्या मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यात सुधार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, रुग्णालयात दाखल केल्यापासूनच या महान अभिनेत्याची पत्नी सायरा बानो त्यांची काळजी घेत आहेत. सायरा प्रत्येक क्षणी त्यांच्यासोबत रुग्णालयातही उपस्थित होत्या. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे लिलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 11:38 am

Web Title: dilip kumars mooh bola beta bollywood actor shah rukh khan visits shower love on the iconic actor see photos
Next Stories
1 शब्दांच्या पलिकडले : तेरे मेरे बीच मे…
2 कथा पडद्यामागचीः रंगभूमी माझ्यासाठी दुसरी आई- जयवंत वाडकर
3 पहलाज निहलानींचा जाता-जाता सिद्धार्थ-जॅकलिनच्या ‘अ जंटलमन’ला झटका?
Just Now!
X