News Flash

२०२० या वर्षात सकारात्मक राहण्यासाठी काय केलं?, दिलजीतने सांगितला त्याचा ‘हॅपिनेस फंडा’

पाहा दिलजीतने सांगितलेला 'हॅपिनेस फंडा'

२०२० हे वर्ष संपूर्ण जगासाठी त्रासदायक ठरलं. करोनामुळे हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. लाखो लोक बेरोजगार झाले. उद्योग क्षेत्राला कोट्यवधींच्या नुकसानाचा सामना करावा लागला. परिणामी आर्थिक मंदी सदृश्य वातावरण निर्माण झालं. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही अभिनेता दिलजीत दोसांजला २०२० हे वर्ष खूप सकारात्मक होतं असं वाटतंय. माझ्यासाठी हे वर्ष एक नवी उर्जा देणारं ठरलं अस तो म्हणाला.

अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा बिकिनी अवतार; हॉट फोटोशूटमुळे चाहते अवाक

आज तकला दिलेल्या मुलाखतीत दिलजीतने २०२० या वर्षावर भाष्य केलं. तो म्हणाला, “करोनामुळे मला बराच काळ आयसोलेशनमध्ये राहावं लागलं. खरं तर या काळात माझ्याकडे दोन पर्याय होते एक तर दु:खी राहणं किंवा आनंदी राहाणं. मी दुसरा पर्याय स्विकारला. जी गोष्ट माझ्या नियंत्रणात नाही त्याबद्दल विचार करुन मी दु:खी का व्हायचं हा विचार मी केला अन् स्वत:ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. या काळात मी अनेक पुस्तकं वाचली. कित्येक चित्रपट पाहिले. कुटुंबीयांसोबत वेळ घालवला. वेळेअभावी अपूर्ण राहिलेल्या सर्व इच्छा मी पूर्ण केल्या. त्यामुळे २०२० हे वर्ष माझ्यासाठी खूप आनंदमय आणि सकारात्मक गेलं.”

अवश्य पाहा – बॅटमॅन-सुपरमॅनला विसरा; या ‘लेडी सुपरहिरो’ दाखवतायेत खरा दम

देशात सहा महिन्यानंतर पहिल्यांदाच करोना रुग्णसंख्या २० हजारांपेक्षा कमी

देशात मागील २४ तासांत १८ हजार ७३२ नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या १ कोटी १ लाख ८७ हजार ८५० इतकी झाली आहे. नवीन रुग्णांबरोबरच देशात २४ तासांत २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत १ लाख ४७ हजार ६२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या २ लाख ७८ हजार ६९० रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ९७ लाख ६१ हजार ५३८ जण करोनातून बरे होऊ घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात २१ हजार ४३० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 12:52 pm

Web Title: diljit dosanjh 2020 coronavirus outbreak in india mppg 94
Next Stories
1 ‘अंदाज अपना अपना’चे सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिदरी काळाच्या पडद्याआड
2 “ताई तुला वेड लागलं आहे का?”; वाईनसोबत बिस्किट खाणारी स्वरा होतेय ट्रोल
3 ‘३ इडियट्स’मधील भूमिकेसाठी बोमन इराणींना शिकावी लागली ‘ही’ अजब कला
Just Now!
X