News Flash

‘तुझ्यासारखी चमचेगीरी करत नाही’; शेतकरी आंदोलनावरुन कंगना-दिलजीतमध्ये जुंपली

कंगना रणौतचा शेतकरी आंदोलनाला विरोध

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच तिने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला विरोध केला होता. तिच्या या भूमिकेवर अभिनेता दिलजीत दोसांज याने टीका केली. मात्र त्याच्या टीकेमुळे कंगना संतापली अन् ती तिने दिलजीतला करण जोहरचा पाळीव प्राणी असं म्हटलं आहे. अर्थात यानंतर दिलजीतचा देखील संयम तुटला अन् त्याने तू देखील बॉलिवूडची पाळीव प्राण्यासारखीच आहेस असं म्हटलं.

अवश्य पाहा – हा ठरला २०२० मधील सर्वाधिक लोकप्रिय शो; ‘दिल बेचारा’ आणि ‘मिर्झापुर’लाही टाकलं मागे

“तू करण जोहरचा पाळीव प्राणी आहेस. जी आजी शाहिनबागमध्ये नागरिकता कायद्याविरोधात आंदोलन करत होती तिच आता शेतकरी आंदोलनातही दिसतेय. मी महिंदर कौर यांना ओळखत नाही. जो ड्रामा तुम्ही सुरु केलाय तो आधी बंद करा.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने दिलजवर संताप व्यक्त केला.

अवश्य पाहा – अभिनेत्याला मिळाली बॉम्बने घर उडवण्याची धमकी; एका फोनने उडाली खळबळ

अर्थात तिच्या या ट्विटवर दिलजीतने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “तू मला पाळीव म्हणतेय खरी, पण या अनुशंगाने विचार करता तू देखील पाळीवच आहे. कारण तू देखील अनेक बॉलिवूड निर्मात्यांसोबत काम केलं आहेत. म्हणजे तूझे अनेक मालिक आहेत. लक्षात ठेव हे बॉलिवूडवाले नाही आहेत शांत बसायला. पंजाबी आहेत. खोटं बोलून त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करु नकोस.” असं ट्विट दिलजीतने केलं.

अवश्य पाहा – ‘चमचेगीरीची देखील एक हद्द असते’; कंगनाच्या ट्विटवर गायकाचं जोरदार प्रत्युत्तर

 

परंतु हे भांडण एवढ्यावरच थांबलं नाही त्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा “ए चमच्या, माझ्यावर टीका करू नकोस… तू ज्यांच्याकडे काम मागतोस, त्यांच्यावर मी रोज टीका करते आणि ते माझ्या टीकेला घाबरतात. त्यामुळे अशा गोष्टींचा तू जास्त गर्व बाळगू नकोस. मी कंगना रणौत आहे. खोटं बोलायला मी तुझ्यासारखी कोणाचीही चमची नाही. मी केवळ शाहिनबागमधील आंदोलकांवर मत मांडलं होतं. या व्यतिरिक्त जर कोणी काही सिद्ध करुन दाखवलं, तर मी नक्कीच माफी मागेन.” अशा आशयाचं ट्विट करुन दिलजीतवर निशाणा साधला. आता दिलजीत काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचेच लक्ष लेगलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2020 6:44 pm

Web Title: diljit dosanjh kangana ranaut farmers protest in delhi mppg 94
Next Stories
1 अनिल कपूर यांच्या लहानपणीचा फोटो व्हायरल
2 आदित्य नारायणने रिसेप्शन पार्टीमध्ये केला डान्स, व्हिडीओ व्हायरल
3 काय होणार राजा राणीच्या संसाराचं? संजीवनीला सोडून रणजीत करणार दुसरं लग्न?
Just Now!
X