29 September 2020

News Flash

‘गूड न्यूज’नंतर आता दिलजीत साकारणार गरोदर पुरुषाची भूमिका

पुरुष गरोदर झाला तर काय होईल?

पंजाबी सिनेसृष्टीत धम्माल करणाऱ्या गायक, अभिनेता दिलजीत दोसांजने ‘उडता पंजाब’ आणि ‘गुड न्यूज’सारख्या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. हा अफलातून अभिनेता आता लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन शाद अली करणार आहेत. परंतु लक्षवेधी बाब म्हणजे हा चित्रपट पुरुषांच्या गरोदरपणावर (Male Pregnancy) आधारित असेल.

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटात यापूर्वी आयुषमान खुराना काम करणार होता. परंतु दिलजीतने ‘गुड न्यूज’मध्ये केलेला अभिनय शाद अली यांना प्रचंड आवडला. परिणामी या आगामी चित्रपटासाठी त्यांनी दिलजीतची निवड केली. या चित्रपटाची कथा पुरुषांच्या गरोदरपणावर आधारित असेल. पुरुष गरोदर झाला तर काय होईल? या संकल्पनेभोवती चित्रपटाची पटकथा रचली जात आहे. सध्या या पटकथेवर काम सुरु आहे. यापूर्वी अशाच एका विषयावर मराठीत ‘इश्श’ नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरीने गरोदर पुरुषाची भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट ‘इश्श’पेक्षा बराच वेगळा असेल असं म्हटलं जात आहे. लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 3:44 pm

Web Title: diljit dosanjh next film on male pregnancy mppg 94
Next Stories
1 Movie Review : गुंजन सक्सेना- वास्तवाला गेलेला छेद नव्हे भलमोठा तडा!
2 ‘सुशांतसोबत काय झालं सगळ्यांना कळायला हवं’, सुरज पंचोलीची सीबीआय चौकशीची मागणी
3 ‘या’ चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला सुशांतचा ‘दिल बेचारा’ चित्रपट
Just Now!
X