वादग्रस्त वक्तव्यांसाठी कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगना बिनधास्तपणे अनेक विषयांवर तिचे मत मांडताना दिसते. नुकताच तिने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली होती. तिने या अंदोलनात सहभागी झालेल्या पंजाबमधील एका वृद्ध महिलेची खिल्ली उडवली होती. पण ट्रोल झाल्यानंतर तिने तिचे ट्विट डिलिट केले होते. आता त्यावर अभिनेता दिलजित दोसांजने ट्विट करत कंगनाला सुनावले आहे.

दिलजित दोसांजने नुकताच ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्याने कंगनाला सुनावले असून त्या वृद्ध महिलेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘महिंदर कौर, मी तुमचा आदर करतो. कंगना हे ऐक. बंदा इतना भी अंधा नही होना चाहिए’ या आशयाचे कॅप्शन देत त्याने कंगनाला सुनावले आहे.

काय होते कंगनाचे ट्विट?
शेतकरी आंदोलनात ८७ वर्षांच्या महिंदर कौर सहभागी झाल्या होत्या. कंगनाने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली होती. तिला या ट्विटमुळे ट्रेल केले जात होते. काही वेळातच तिने हे ट्विट डिलिट केले.

कंगनाने या आजीसंदर्भात ट्विट केल्यानंतर ते चुकीचे असल्याचे ऑल्ट न्यूजचे प्रतिक सिन्हा यांनी सांगितले. तसेच त्यात करण्यात आलेले दावेदेखील खोटे आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी कंगनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.