News Flash

#DiljitVsKangana: ‘कंगना को दिलजीत पेल रहा है’ विरुद्ध ‘कंगना रानौत शेरनी है’… मिम्समधून धम्माल टोलवाटोलवी

दोघांचेही चाहते एकमेकांना ट्रोल करत आहेत

(फोटो : ट्विटवरुन साभार)

दिल्लीमध्ये सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन सोशल नेटवर्कींगवर दोन कलाकार आमने-सामने आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी कंगना रणौत आणि अभिनेता दिलजीत दोसांज यांच्यामध्ये सोशल नेटवर्कींगवर चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळालं. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी सोशल नेटवर्कींगवर कंगना आणि दिलजीतचे समर्थक एकमेकांसमोर उभे ठाकले असून या मुद्द्यावरुन आता ट्विटरवर ट्रेण्डवॉर सुरु झालं आहे. ट्विटरवर सध्या #DiljitVsKangana, #कंगना_को_दिलजीत_पेल_रहा_है, #DiljitDestroysKangana, #DiljitRocks, #कंगना_रानौत_शेरनी_है असे हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहेत.

काय आहे प्रकरण?

अलिकडेच कंगनाने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला विरोध केला होता. तिच्या या भूमिकेवर अभिनेता दिलजीत दोसांज याने टीका केली. मात्र त्याच्या टीकेमुळे कंगना संतापली अन् ती तिने दिलजीतला करण जोहरचा पाळीव प्राणी असं म्हटलं आहे. अर्थात यानंतर दिलजीतचा देखील संयम तुटला अन् त्याने तू देखील बॉलिवूडची पाळीव प्राण्यासारखीच आहेस असं म्हटलं.

“तू करण जोहरचा पाळीव प्राणी आहेस. जी आजी शाहिनबागमध्ये नागरिकता कायद्याविरोधात आंदोलन करत होती तिच आता शेतकरी आंदोलनातही दिसतेय. मी महिंदर कौर यांना ओळखत नाही. जो ड्रामा तुम्ही सुरु केलाय तो आधी बंद करा.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने दिलजवर संताप व्यक्त केला. अर्थात तिच्या या ट्विटवर दिलजीतने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “तू मला पाळीव म्हणतेय खरी, पण या अनुशंगाने विचार करता तू देखील पाळीवच आहे. कारण तू देखील अनेक बॉलिवूड निर्मात्यांसोबत काम केलं आहेत. म्हणजे तूझे अनेक मालिक आहेत. लक्षात ठेव हे बॉलिवूडवाले नाही आहेत शांत बसायला. पंजाबी आहेत. खोटं बोलून त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करु नकोस.” असं ट्विट दिलजीतने केलं.

परंतु हे भांडण एवढ्यावरच थांबलं नाही त्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा “ए चमच्या, माझ्यावर टीका करू नकोस… तू ज्यांच्याकडे काम मागतोस, त्यांच्यावर मी रोज टीका करते आणि ते माझ्या टीकेला घाबरतात. त्यामुळे अशा गोष्टींचा तू जास्त गर्व बाळगू नकोस. मी कंगना रणौत आहे. खोटं बोलायला मी तुझ्यासारखी कोणाचीही चमची नाही. मी केवळ शाहिनबागमधील आंदोलकांवर मत मांडलं होतं. या व्यतिरिक्त जर कोणी काही सिद्ध करुन दाखवलं, तर मी नक्कीच माफी मागेन.” अशा आशयाचं ट्विट करुन दिलजीतवर निशाणा साधला. आता दिलजीत काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचेच लक्ष लेगलं आहे.

काही ट्रेण्डींग ट्विटस…

१) हे अपेक्षित होतं

२) अरे मी काय…

३) आता मजा येतेय

४) हे असं आहे म्हणे…

५) मी समर्थक

६) आम्ही मात्र कंगनाच्या बाजूने

७) देशद्रोह्यांविरोधात लढतेय

८) बुद्धी कुठे गेलीय?

९) राजकीय आरोपही

१०) स्टार बनवणार

एंकदरितच सोशल नेटवर्किंगवर कंगनाच चाहते आणि दिलजीतचे चहाते एकमेकांना ट्रोल करतानाचे चित्र दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 10:47 am

Web Title: diljit dosanjh vs kangana ranaut fans fight in hashtag war scsg 91
Next Stories
1 Viral Video : पोलिसाची कमाल! हातातलं आईस्क्रीम खाली पडू न देता चोरट्यांशी केला मुकाबला
2 …अन् सात वर्षाच्या मुलीने दिलेली ऑर्डर घेऊन ४२ फूड डिलेव्हरी बॉइज घरासमोर झाले हजर
3 TOP 5 : MDH च्या ‘या’ जाहिराती व्हायरल झाल्याने देशभरात फेमस झाले ‘मसाला किंग’
Just Now!
X