सुपरस्टारपदापर्यंत पोहोचवणारा अविस्मरणीय चित्रपट – शाहरूख खान

मुंबई : शाहरूख खान आणि काजोल या दोन तरूण कलाकारांना घेऊन आदित्य चोप्रा या तरूणाने दिग्दर्शित के लेला पहिलाच चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ २० ऑक्टोबर १९९५ साली प्रदर्शित झाला होता.  मंगळवारी या चित्रपटाने पंचविशी पूर्ण के ली.   गेली २५ वर्ष हा चित्रपट रसिकांना आजही खुणावतो आहे.   यानिमित्ताने चित्रपटाच्या आठवणी जागवताना आपल्याला सुपरस्टारपदापर्यंत पोहोचवणारा हा अविस्मरणीय चित्रपट असल्याची भावना अभिनेता शाहरूख खानने व्यक्त के ली आहे.

marathi actress smita shewale shares experience about yanda kartavya aahe movie
‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरूखने ‘डर’, ‘बाजीगर’, ‘अंजाम’, ‘माया मेमसाब’सारखे चित्रपट के ले होते. या चित्रपटांमधून त्याने नकारी भूमिका केल्या होत्या. माझा चेहरा या अशा नकारी किं वा वेगळ्या भूमिकांमध्ये चपखल बसू शकतो.  त्यामुळे यश चोप्रा आणि आदित्य चोप्रांनी मला ही भूमिका देऊ के ली. मला वाटते माझ्यावरच्या प्रेमापोटी आदित्यने ही भूमिका मला देऊ के ली होती. याच चित्रपटाने मला सुपरस्टार पदापर्यंत पोहोचवले. माझ्यासाठी हा अविस्मरणीय चित्रपट आहे, अशा शब्दांत शाहरूखने आपली भावना व्यक्त के ली. १९९५ मध्ये प्रदर्शित  या चित्रपटाने तिकीटबारीवरील कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढले होते.  देशभरातून ८९ कोटींची तर परदेशातून १३.५० कोटींची कमाई के ली होती. ‘राजची व्यक्तिरेखा मुळातच छान आणि गोड अशी होती. त्यात मी माझ्या वागण्या बोलण्यातील सवयींची जोड या भूमिके ला दिली होती. विशेषत: छोटय़ा छोटय़ा गोष्टींत विनोद करत बोलण्याची माझी सवय मी या भूमिके साठी वापरली’, असे सांगणाऱ्या शाहरूखने आपण आजही या चित्रपटाची गाणी ऐकतो, या गाण्यांचा कं टाळा येत नाही,   या चित्रपटाच्या यशात के वळ राज आणि सिमरनचा नाही तर आदित्य चोप्रापासून चित्रपटाच्या सगळ्या टीमचाच मोठा सहभाग आहे.  माझ्या चेहऱ्यामुळे सगळ्यांपेक्षा वेगळी व्यक्तिरेखा साकारू शके न, असे मला कायम वाटायचे.  या चित्रपटाने सगळी गणिते बदलून टाकली. मला लोकांनी गोड गोड, चांगला नायक समजू नये यासाठी गेली २५ वर्ष मी सातत्याने प्रयत्न करतो आहे. पण मला त्यात यश आले नाही, याचाही आनंद आहे, असे सांगणाऱ्या शाहरूखने आपल्या ट्विटर अकाऊं टवर राज मल्होत्रा हे नाव लावले आहे. काजोलनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर सिमरन नाव लावत चित्रपटाचा रौप्यमहोत्सव साजरा के ला आहे.

लंडनमध्ये राज-सिमरनचा पुतळा

चित्रपटात लंडनमधील लिसेस्टर स्क्वे अर येथे चित्रित झालेले एक दृश्य आहे. त्याच दृश्यावर आधारित राज आणि सिमरनचा पुतळा याच परिसरात ‘सीन्स इन द स्क्वे अर’ अंतर्गत उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याचे अनावरण पुढच्या वर्षी होणार असून जेन के ली, लॉरेल अ‍ॅण्ड हार्डी यासारख्या हॉलिवूडमधील दिग्गजांबरोबर बॉलिवूड कलाकारांना पहिल्यांदाच हा मान मिळाला ही अभिमानाची बाब असल्याचे यशराज फिल्म्सच्या स्पेशल प्रोजेक्टसचे उपाध्यक्ष अवतार पनेसर यांनी सांगितले.