News Flash

हॉलिवूड सुपरस्टार ख्रिस्तोफर नोलानच्या चित्रपटात झळकणार ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री

‘इनसेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ ‘बॅटमॅन द डार्क नाइट’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा ख्रिस्तोफर नोलान हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

हॉलिवूड सुपरस्टार ख्रिस्तोफर नोलानच्या चित्रपटात झळकणार ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री
‘टेनेट’ हा चित्रपट १७ जुलै २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘इनसेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ ‘बॅटमॅन द डार्क नाइट’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा ख्रिस्तोफर नोलान हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. कठीणातील कठीण विषय अगदी सोप्या पद्धतीने चित्रपट माध्यमातून हाताळण्याच्या विशेष शैलीमुळे अगदी कमी कालावधीत त्याने अफाट यश मिळवले. आता हा महत्वकांक्षी दिग्दर्शक आपल्या अगामी चित्रपटाची तयारी करत आहे. त्यामुळे विदेशी प्रेक्षकांसह भारतीय प्रेक्षकांनाही त्याच्या या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे त्याच्या या आगामी चित्रपटामध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.

ख्रिस्तोफर नोलान याच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘टेनेट’ असं असून या चित्रपटामध्ये अभिनेत्री डिंपल कपाडिया झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने डिंपल कपाडिया पहिल्यांदाच त्याच्यासोबत काम करणार आहे.

‘टेनेट’ हा चित्रपट १७ जुलै २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी जगातील सर्वात मोठ्या प्रोडक्शन कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॉर्नर ब्रदर्स कंपनीने स्विकारली आहे. टेनेट, या शब्दाचा अर्थ सिद्धांत असा होतो. चित्रपटाच्या नावावरूनच नोलान पुन्हा एकदा डार्क नाईट ट्रायोलॉजी किंवा डंकर्क पठडीतला चित्रपट तयार करत असल्याची चर्चा होती. परंतु, यावेळी नोलान आपल्या पारंपारिक शैलीपेक्षा एक वेगळाच प्रयोग करत असल्याची माहिती निर्माते वॉर्नर ब्रदर्स यांनी दिली आहे. यामुळे चाहते या अगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

‘टेनेट’ या चित्रपटात अभिनेत्री डिंपल कपाडिया व्यतिरिक्त माइकल केन, केनेथ ब्रेनॉग, एरॉन टेलर जॉनसन, क्लीमेंस पोसी आणि एलिजाबेथ डेबिकी हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. अभिनेत्री डिंपल कपाडियाच्या भूमिकेविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती वॉर्नर ब्रदर्स यांनी दिलेली नाही. मात्र ख्रिस्तोफर नोलानची पार्श्वभूमी पाहता डिंपल एका सशक्त भूमिकेत दिसणार यात शंका नाही.

दरम्यान, ख्रिस्तोफर नोलान हा प्रामुख्याने मसालेदार मनोरंजनापेक्षा नाट्यमय चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याच्या प्रत्येक चित्रपटात जीवनविषयक तत्वज्ञान पहायला मिळते. तसेच त्याने रेखाटलेली प्रत्येक व्यक्तीरेखा आपल्या जबरदस्त संवादांमुळे प्रचंड लोकप्रियता मिळवते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2019 1:58 pm

Web Title: dimple kapadia got role in christopher nolan film
Next Stories
1 Photo : बेबी फिल्टरचा प्रयोग दीपिकाच्या फोटोवर, रणवीरने शेअर केला फोटो
2 कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना फातिमाचं जबरदस्त उत्तर
3 गलती से मिस्टेक? विवेकने मोदींसाठी केले ट्विट, सलमानच्या सिनेमाचे झाले प्रमोशन