03 March 2021

News Flash

नऊ वर्षांनंतर मनोरंजन विश्वात परतणार डिनो मोरिया

व्यवसायांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर हा कलाकार आता परत अभिनयाकडे वळला आहे

बॉलिवूड अभिनेता- मॉडेल डिनो मोरिया लवकरच डिजिटल विश्वात पदार्पण करताना दिसणार आहे. मधल्या काळात नानाविध प्रकारच्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर हा कलाकार आता परत अभिनयाकडे वळला आहे.  तब्बल नऊ वर्षांनंतर तो मनोरंजन विश्वाकडे परतत आहे.

‘फिल्म आणि वेब अशा मनोरंजनाच्या दोन्ही माध्यमांमध्ये माझी काम करण्याची तयारी आहे. मोठ्या पडद्यावरील एका प्रोजेक्टच्या कथेवरही सध्या काम सुरु आहे. असे असले तरी वेबविश्वातील ऑफर्स आणि त्यातील भूमिका या अधिक निरनिराळ्या असून जगातील प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठीचं हे उत्तम व्यासपीठ आहे’ असं म्हणत डिनोनं डिजिटल विश्वात पदार्पण करण्याचं प्रमुख कारण सांगितलं.

डिनोला वेब सिरीजसाठी अनेक ऑफर्स आल्याचे सूत्रांकडून समजते. काही डिजिटल शोजच्या निर्मात्यांनी त्यांच्या नवीन शोजमधील प्रमुख भूमिकेसाठी डिनोला विचारणा केल्याचे समोर येते. या सगळ्यातून त्याने २-३ कथांची निवड केली आहे ज्यातून त्याचे अभिनयकौशल्य अधिक सिद्ध होईल. या सीरिजमधल्या भूमिकेवर काम करायला डिनोने सुरुवात केली असून फेब्रुवारीपासून शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 4:52 pm

Web Title: dino morea to make a comeback after nine years
Next Stories
1 बॉबी देओलच्या मुलावर नेटकरी फिदा
2 निर्भया बलात्कार प्रकरणावर नेटफ्लिक्सवर वेब सीरिज
3 अनिल कपूर ‘या’ आजाराने त्रस्त, उपचारासाठी जाणार परदेशात
Just Now!
X