छोट्या पडद्यावरची ‘आदर्श सून’ आणि ‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका कक्कर इब्राहिम ‘बिग बॉस १२’ ची विजेती ठरली आहे. करणवीर बोहरा, दीपक ठाकूर, श्रीशांत या विजेतपदाच्या प्रबळ दावेदारांना मात देत दीपिकानं ‘बिग बॉस १२’ स्पर्धा जिंकली आहे. अंतिम फेरीत दीपिका आणि श्रीसंत या दोघांमध्ये चुरस पाहायला मिळाली अखेर दीपिकानं या खेळात बाजी मारली.
रविवारी ३० डिसेंबर रोजी ‘बिग बॉस १२’ चा फिनाले रंगला. या पर्वाचा विजेता कोण याची उत्सुकता शोच्या चाहत्यांना लागून होती. अखेर दीपिकानं श्रीसंतला टक्कर देत ‘बिस बॉस’च्या विजेतेपदावर आपलं नावं कोरलं. सलग १०५ दिवस उत्तम खेळी करत दीपिका या घरात टिकून होती. त्यामुळे घरातील इतर मंडळींचाच नाही तर चाहत्यांचाही तिला मोठा पाठिंबा होता.
दीपिका आणि श्रीसंत यांनी शेवटपर्यंत उत्तम खेळी केली. दीपिका श्रीशांतला तिचा भाऊ मानते, त्यामुळे अंतीम स्पर्धा ही खऱ्या अर्थानं बहिण भावामध्ये रंगली. पण, अखेर या खेळात दीपिकाची सरशी झाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 31, 2018 8:38 am