सध्या करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताना दिसत आहेत. अशातच मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकरने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर मत मांडले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अनेक नव्या तरुणांना संधी मिळतील असे त्याने म्हटले आहे.

अक्षयने मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. सोलापूर ते बर्लिन हा प्रवास कसा झाला, त्यानंतर ‘स्थलपुराण’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या कामाची दखल हॉलिवूडमधील मासिकांनी देखील घेतल्याचे त्याने म्हटले आहे.