27 May 2020

News Flash

कुठलाच धर्म संकटात नाहीये? सगळं ठीक आहे ना?; अनुभव सिन्हा यांचा खोचक सवाल

त्यांचं ट्विट अनेकांच्या नजरा वेधत आहे

अनुभव सिन्हा

करोना विषाणूमुळे संपूर्ण देश हवालदिल झाला आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक सजग झाला असून आरोग्याविषयीची योग्य ती खबरदारी घेत आहे. यातच सध्या करोनाने देशात शिरकाव केल्यामुळे अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या अशा करोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे देशावरील संकट टळावं यासाठी संपूर्ण देश एकत्र आला आहे. त्यामुळे प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांदेखील नागरिकांच्या एकजुटीवर मत मांडलं आहे. ‘सध्या कोणताच धर्म संकटात नाही’, असं ट्विट त्यांनी केलं. या ट्विटनंतर अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आहेत.

‘गेल्या बऱ्याच दिवसांपासून कोणताही धर्म संकटात नाहीये? सगळं ठीक आहे ना?’,असं ट्विट अनुभव सिन्हा यांनी केलं आहे. विशेष म्हणजे सध्या जगावर, देशावर आलेल्या संकटामुळे प्रत्येक नागरिक जात-धर्म विसरुन एक झाले आहेत. प्रत्येक जण मदतीसाठी पुढे सरसावत आहे. त्यामुळेच अनुभव यांनी असं ट्विट केल्याचं लक्षात येतं.

तसंच त्यांनी मोलमजुरी करणाऱ्या कामगारांसाठीदेखील एक ट्विट केलं आहे.

वाचा : ‘घरचं सामान घेऊन जाणाऱ्यालाही मारणं योग्य आहे का?’; दिग्दर्शकाचा संतप्त सवाल

दरम्यान, अनुभव सिन्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतात. समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर ते व्यक्त होत असतात. अलिकडेच त्यांनी लॉकडाउनच्या काळात पोलिसांनी एका तरुणाला मारल्यामुळे ट्विट केलं होतं. त्यांचं हे ट्विटदेखील वाऱ्यासारखं पसरलं होतं. विशेष म्हणजे नेटकऱ्यांनी या ट्विटवर लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 11:15 am

Web Title: director anubhav sinha tweet viral during coronavirus says no religion is in danger ssj 93
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘रामायण’ या वेळेत आणि या चॅनेलवर होणार प्रदर्शित, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती
2 Video : दीपिकाने कतरिनावर केला चोरीचा आरोप
3 आमिरच्या लेकीची आगळीवेगळी इच्छा; अभिनेत्याला नव्हे अभिनेत्रीला करायचंय डेट
Just Now!
X