‘एक पल’, ‘रुदाली’, ‘चिंगारी’, ‘दमन’ या स्त्रीप्रधान चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शिका कल्पना लाजमी या कॅन्सरशी झुंज देत आहेत. किडनीचा कॅन्सर झालेल्या कल्पना यांची तब्येत काल पहाटे अधिकच बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना पुढचे २४ ते ४८ तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल.

वाचा : प्रदर्शनापूर्वीच भन्साळींनी काढला ‘पद्मावती’चा विमा

कल्पना यांच्या आई ललिता लाजमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी कल्पना यांची प्रकृती अधिकच बिघडल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. ६१ वर्षीय कल्पना यांच्यावर आठवड्यातून चारवेळा डायलिसिस करण्यात येते. त्यांची एक किडनी काढण्यात आली असून त्यांच्या दुसऱ्या किडनीला संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांचा खर्चही बॉलिवूड सेलिब्रिटी उचलत असल्याचे कळते.

कल्पना यांच्यावरील उपचारांसाठी दर महिन्याला जवळपास अडीच लाखांचा खर्च येतो. या खर्चाची जबाबदारी ‘इंडियन फिल्म्स अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’, आमिर खान आणि रोहित शेट्टी यांनी उचलली आहे. तसेच, आसाम विद्यार्थी संघटनेच्या सर्व नेत्यांनी शनिवारी लाजमी यांची भेट घेऊन त्यांना उपचारांसाठी आर्थिक मदत केली.

वाचा : ‘चला हवा येऊ द्या’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

२००१ साली आलेला ‘दमन’ हा कल्पना यांचा शेवटचा चित्रपट आहे. ‘रुदाली’ चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.