अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणी चौकशी सुरु असताना ड्रग्ज सेवन प्रकरण समोर आले. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) या प्रकरणी चौकशी करत आहे. यामध्ये दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुलप्रीत सिंह अशी अनेक नावे समोर आली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ड्रग्ज विषयी जोरदार चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर केदार शिंदेंनी ट्विट करत अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
केदार यांनी ट्विटमध्ये, ‘अभिमानाने सांगावं आणि स्वाभिमानाने मिरवावं असंच काम हातून घडायला हवं. कारण मराठी मनोरंजन क्षेत्रात “माल” नाही तर, रसिकांचं “मोल” महत्वाचं ठरतं….’ असे म्हटले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चर्चेत असून अनेकांनी लाईक केले आहे.
अभिमानाने सांगावं आणि स्वाभिमानाने मिरवावं असच काम हातून घडायला हवं. कारण मराठी मनोरंजन क्षेत्रात “माल” नाही तर, रसिकांचं “मोल” महत्वाचं ठरतं….
— Kedhar Yeshodhara Shinde (@mekedarshinde) October 1, 2020
‘माल’ची चर्चा
दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंह या अभिनेत्रींची नावे एनसीबीच्या चौकशीत समोर आली होती. या चौकशीमध्ये व्हॉट्सअॅप चॅट देखील समोर आले होते. ज्यामध्ये एका ग्रूपमध्ये दीपिकाने ‘माल है क्या’ (अंमली पदार्थ आहे का?) अशी विचारणा केली होती. तेव्हापासून सोशल मीडियावर माल हा शब्द चर्चेत आहे.
आता या प्रकरणी काही अभिनेत्यांची नावे समोर आली आहेत. A, D,R आणि S ही नाव समोर आली आहेत. त्यानुसार, A म्हणजे अर्जुन रामपाल, D = डिनो मोरिया, R= रणबीर कपूर आणि S = शाहरुख खान हे अभिनेते आहेत. तसेच बॉलिूडमधील ड्रग्ज प्रकरणी सुरु असलेल्या चौकशीमध्ये एका ड्रग्ज पेडलरने ही माहिती दिल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांने सांगितलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 1, 2020 5:22 pm