सध्या करोनामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच करोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. ‘हम तुम’ आणि ‘फना’ या बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या कुणाल कोहलीच्या घरातील एका सदस्याचा देखील करोनामुळे मृत्यू झाला आहे. कुणालने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती देत श्रद्धांजली वाहिली आहे.

‘आठ आठवडे करोनाशी झुंज दिल्यानंतर शिकागोमध्ये राहणाऱ्या माझ्या मावशीला मी गमावले आहे. माझे कुटुंब खूप मोठे आहे आणि आम्ही एकमेकांशी खूप क्लोज आहोत. सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही एकत्र येऊ शकत नाही. मावशीच्या जाण्याने मला दु:ख झाले आहे’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्यानंतर कुणालने आणखी एक ट्विट केले आणि म्हणाला, ‘त्यांची मुलगी दररोज रुग्णालयाच्या परिसरात जायची, कार पार्किंगमध्ये थांबायची आणि आईसाठी प्रार्थना करायची. कारण तिला रुग्णालयात जाण्याची परवानगी नव्हती. ‘

‘पाच बहिणी, तीन भाऊ. पण बहिणी थोड्या वेगळ्या असतात. त्यांच्यामधील नाते हे कधीच तूटत नाही. केलळ मृत्यूच त्यांना एकमेकींपासून लांब करु शकतो’ असे कुणालने पुढे ट्विट करत त्याच्या आई आणि मावशीमध्ये असणाऱ्या नात्याबद्दल सांगितले आहे.