02 March 2021

News Flash

VIDEO : …म्हणून व्हायरल होतोय आलियाच्या बालपणीचा व्हिडिओ

आलियाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे

आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटट् हिने नुकताच तिचा २५ वा वाढदिवस साजरा केला. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली आलिया सध्याच्या घडीला बी- टाऊनमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते. अभिनयासोबतच निरागस सौंद्याची देणगी लाभलेल्या आलियाच्या चाहत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. असंख्य चाहत्यांच्या या गर्दीत तिच्या वडिलांचा म्हणजेच महेश भट्ट यांचाही समावेश आहे.

आलियाचा प्रचंड अभिमान वाटणाऱ्या महेश भट्ट यांनी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ म्हणजे आठवणींचा एक अनमोल ठेवा असल्याचंही त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. अवघ्या काही मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये आलियाचं गोंडस रुप पाहून अनेकजण तिच्या प्रेमातच पडले आहेत. या व्हिडिओतून वडील आणि मुलगी यांच्यात असलेलं सुरेख नातंही पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ बऱ्याचजणांनी शेअर करत तो व्हायरल झाल्याचं लक्षात येत आहे.

महेश भट्ट यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये ते चिमुकल्या आलियासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं एक गाणं गाताना दिसत आहेत. तर आलियासुद्धा त्यांच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहाताना दिसतेय. तीस हजारहून जास्त नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला असून, आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

वाचा : टीकाकारांकडे मी लक्षच देत नाही- राधिका आपटे

आलिया सध्या ‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘राझी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राझी’ या चित्रपटातील तिचा एक लूक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. ९ एप्रिलला तिच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यात ती भारतीय लष्कराला गुप्त माहिती पुरवणाऱ्या पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 1:28 pm

Web Title: director mahesh bhatt shares daughter bollywood actress alia bhatt childhood video on social media
Next Stories
1 Video : १, २, ३…. आणि ‘मोहिनी’ परत आलीये..
2 …म्हणून प्रिया वारियर मोबाइल वापरत नाही
3 हर्षवर्धन कपूरच्या नखऱ्यांनी सगळेच त्रस्त
Just Now!
X