03 August 2020

News Flash

सुश्मिताशी ब्रेकअपवर दिग्दर्शकाने इतक्या वर्षांनी केला खुलासा

''ब्रेकअपच्या वृत्तांचा माझ्या आई-वडिलांवर फार परिणाम झाला.''

सुश्मिता सेन

अभिनेत्री सुश्मिता सेनचं व्यावसायिक आयुष्य जितकं चर्चेत होतं त्याहून अधिक तिच्या खासगी आयुष्यामुळे ती चर्चेत होती. बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांसोबत सुश्मिताचं नाव जोडलं गेलं. आता पुन्हा एकदा ती चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे एका दिग्दर्शकाची मुलाखत. दिग्दर्शक मुदस्सर अजीजने ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत सुश्मितासोबतच्या नात्यासोबत आणि तिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर काय घडलं याविषयी सांगितलं.

”सुश्मिताशी ब्रेकअप झाल्यानंतर मी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण त्या वृत्तांचा माझ्या कुटुंबीयांवर खूप मोठा परिणाम झाला. मी एका सामान्य कुटुंबातला मुलगा आहे. वृत्तपत्र, टीव्हीवर माझ्याविषयी येणाऱ्या बातम्या पाहून, वाचून त्यांचा खूप त्रास व्हायचा. माझ्या आईवडिलांसोबत मी नीट बोलू शकत नव्हतो,” असं तो म्हणाला.

यावेळी त्याने सुश्मिताची प्रशंसासुद्धा केली. ”सुश्मिता ही एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे. ती तिच्या अटींवर आयुष्य जगते. प्रत्येकजण असं करू शकत नाही. त्यामुळे मला तिच्याबद्दल खूप आदर आहे. तिच्याबद्दल कुठलाही राग माझ्या मनात नाही,” असं त्याने सांगितलं.

मुदस्सर सध्या अभिनेत्री हुमा कुरेशीला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वी हुमाने सोशल मीडियाद्वारे याविषयी माहिती दिली. तर सुश्मिता रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 4:11 pm

Web Title: director mudassar aziz revealed why he broke up with sushmita sen ssv 92
Next Stories
1 फत्तेशिकस्तमध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार बहिर्जी नाईक यांची भूमिका
2 ‘राजी’, ‘सत्यमेव जयते’नंतर ‘मलंग’ मध्ये दिसणार अमृता खानविलकर
3 ‘केबीसी’त बच्चन समोर असतात पण ऑटोग्राफ देतात का? जाणून घ्या शो बद्दल काही गोष्टी
Just Now!
X