News Flash

‘आता तुझा फोनही येणार नाही’; सुशांतच्या आठवणीत ‘दिल बेचारा’चे दिग्दर्शक भावूक

सुशांतच्या आठवणीत मुकेश छाब्रा भावूक

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करून आज एक महिना उलटला. १४ जून रोजी सुशांतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे अद्यापही अनेक जण या धक्क्यातून सावरले नाहीत. त्यातच आज त्याचा मृत्यू होऊन एक महिना पूर्ण झाल्यामुळे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मुकेश मुकेश छाब्रा यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

कलाविश्वातील अनेकांनी आज सुशांतच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे.सोबतच त्याची प्रचंड आठवण येते असंही अनेकांनी म्हटलं आहे. यात मुकेश मुकेश छाब्रा यांनीही भावूक होऊन एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत येत आहे.

“एक महिना झाला आज, आता तर परत कधीच तुझा फोन येणार नाही”, असं ट्विट मुकेश मुकेश छाब्रा यांनी केलं आहे. त्यांनी या एका ओळीतून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, आज सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेदेखील सुशांतसाठी पोस्ट शेअर केली आहे. तिच्यासोबतच सुशांतच्या मित्र-परिवारातील अनेकांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी केली आहे. सुशांतने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतर कलाविश्वात मोठी खळबळ माजली होती. अनेकांच्या मते, सुशांतने नैराश्यात येऊन आत्महत्या केली. तर काहींच्या मते बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने जीवन संपवलं असं म्हटलं जात आहे. मात्र, अद्यापही त्याच्या आत्महत्येचं खरं कारण स्पष्ट झालेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 2:02 pm

Web Title: director mukesh chhabra tweet on sushant singh rajput death ssj 93
टॅग : Sushant Singh Rajput
Next Stories
1 सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्तीची पहिली पोस्ट, म्हणाली..
2 आलिया भट्टच्या बहिणीला बलात्कार व जीवे मारण्याची धमकी; करणार कायदेशीर कारवाई
3 ‘बिग बी व अभिषेकचा उपचारांना चांगला प्रतिसाद’; डिस्चार्ज देण्याबाबत रुग्णालयाची ही माहिती
Just Now!
X