लोकप्रिय हॉलिवूड दिग्दर्शक किली एसबरी यांच निधन झालं आहे. ते ६० वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांच्यापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. उपचारादरम्यान लॉस एंजेलिसमधील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. एसबरी यांच्या निधनामुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

एसबरी प्रामुख्याने अ‍ॅनिमेडेट चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आजवर ‘स्मर्फ्स: द लॉस्ट व्हिलेज’, ‘शार्क’, ‘ब्युटी अँड द बिस्ट’, ‘शेरलॉक ग्नोमेज’, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली होती. लहान मुलांचा दिग्दर्शक म्हणून त्यांचे कौतुक केले जायचे.

१९८३ साली एक अ‍ॅनिमेटर म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. सुरुवातीला ते डिस्ने स्टुडिओच्या कार्टून मालिकांमध्ये अ‍ॅनिमेशनचे काम करत असत. त्यानंतर काही कार्टूनपटांसाठी त्यांनी व्हॉईज ओव्हर, टेक्निशियन, आर्ट डिरेक्टर, स्टोरी आर्टिस्ट अशी अनेक कामं केली. पुढे पाहता पाहता त्यांना दिग्दर्शन करण्याचीही संधी मिळाली. या संधीच त्यांनी सोनं केलं. त्यांनी जबरदस्त अ‍ॅनिमेशनपटांची निर्मिती केली. एसबरी यांच्या निधनामुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.