News Flash

PHOTO : करणचे यश- रुही झाले ६ महिन्यांचे

करण वडिलांच्या भूमिकेत चांगलाच रुळलाय

करण जोहर

करण जोहर त्याच्या खासगी आयुष्याविषयी बऱ्याचदा उघडपणे बोलतो. याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे त्याची मुलं. अशा या लाडक्या मुलांविषयी म्हणजे यश आणि रुहीच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी तर बरेचजण करणच्या सोशल मीडिया अकाऊंटचा आधार घेत असतात. याच कुतूहलपूर्ण वातावरणात त्याने आपल्या मुलांचा सुरेख फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये केजोच्या मुलांचा चेहरा अगदी नीट पाहायला मिळत आहे.

सर्वत्र रक्षाबंधनचा उत्साह असतानाच आपल्या मुलांचं हे पहिलंच रक्षाबंधन असल्यामुळे बहुधा त्याने हा फोटो शेअर केला असावा. कारण, या फोटोला त्याने कॅप्शनही तसच दिलं आहे. या कॅप्शनमध्ये आपली मुलं सहा महिन्याची झाल्याचा आनंद व्यक्त करत त्याने #roohiandyash #happyrakshabandhan #lovesofmylife असे हॅशटॅगही दिले आहेत. करणच्या आईने दोन्ही नातवंडांना अगदी प्रेमाने उचललं असून त्यांच्याही चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची आनंदलहर पाहायला मिळत आहे.

वाचा : गोष्ट पहिल्या सुपरस्टारच्या पहिल्या प्रेयसीची…

नुकतच करणने त्याच्या या जुळ्या मुलांसाठी एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांच्या येण्यामुळे आपलं आयुष्य कितपत बदललं आहे हे त्याने लिहिलेल. मुलांना मोठं होताना पाहण्याची आणि त्यांची काळजी घेण्यामागची भावना त्याने या पत्रातून व्यक्त केली होती. एकल पालकत्व स्वीकारणाऱ्या करणच्या आयुष्यात सरोगसीद्वारे यश आणि रुहीचं आगमन झालं होतं. ज्यावेळी त्याने आपण गोड मुलांचं पालकत्व स्वीकारल्याचं जाहीर केलं होतं त्यावेळी अनेकांनीच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. तेव्हा आता निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून स्वत:ला सिद्ध करणारा करण जोहर यश आणि रुहीच्या वडिलांच्या भूमिकेत चांगलाच रुळलाय असं म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 4:32 pm

Web Title: director producer karan johar reveals first picture of his twins yash and roohi on instagram see photo
टॅग : Karan Johar
Next Stories
1 या कारणामुळे शाहरुखची बहिण प्रसारमाध्यमांपासून राहते दूर
2 अनुष्कासोबतच्या नात्याविषयी प्रभास म्हणतो…
3 अन् अक्षयने सर्वांसमोर ट्विंकलने लिहिलेलं ‘विचित्र’ पत्र वाचलं
Just Now!
X