News Flash

‘थलायवी’चा ट्रेलर पाहताच राम गोपाल वर्मायांनी कंगनाचं केलं कौतुक, कंगना म्हणाली…

कंगनाचे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. त्यातचं दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या सोबत अनेक वेळा कंगनाचं खटकलं आहे. त्यांच ट्विवटर वॉर आपण अनेक वेळा पाहिलं आहे. मात्र कंगनाच्या थलाइवी या आगामी चित्रपटाचा ट्रेलर पाहून राम गोपाल वर्मा यांनी यावेळी तिची स्तुती केली आहे.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी कंगनाच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे, तसेच तिला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राम गोपाल वर्मा यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. “काही विशिष्ट गोष्टींबद्दल मी कदाचित तुझ्या मतांवर असहमत असेल, परंतु अशा थलायवीचा अप्रतिम ट्रेलर पाहिल्यानंतर तुला सलाम करतो. मला वाटते की जयललिता देखील स्वर्गात बसून आनंदित होत असतील.” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

त्यांचे ट्विट पाहिल्यानंतर कंगनाने ही त्यांना उत्तर दिले आहे. “सर तुम्ही जे बोलत आहात त्यावर मी सहमत आहे. मला तुम्ही खूप आवडता आणि मी नेहमीच तुमचे कौतुक करते. अशा गंभीर जगात जिथे अहंकार आणि अभिमानाने लोक असतात, ज्यामुळे ते लगेच दुखावले जातात, मी तुमचे कौतुक करते की तुम्ही कोणतीही गोष्ट गंभीरपणे घेत नाही, अगदी स्वत:लाही…माझे कौतुक केल्या बद्दल धन्यवाद.” कंगनाने दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

कंगनाच्या वाढदिवसानिमित्ताने ‘थलायवी’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. एका प्रसिद्धा अभिनेत्री पासून राजकारणी होई पर्यंतचा जयललिता यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ‘थलायवी’ हा चित्रपट २४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 10:21 am

Web Title: director ram gopal varma praised kangana ranaut for her thalaivi trailer kanganas reaction went viral dcp 98
Next Stories
1 सोशल मीडियावर दिशाचा जलवा; हॉट फोटोवर चाहते घायाळ
2 १०० रुपयांमध्ये तिकीट… सहकुटुंब नाटक पाहता यावं म्हणून प्रशांत दामलेंचा निर्णय
3 दिवसाआड लसीकरण
Just Now!
X