निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा विविधांगी भूमिका पार पाडणारा रवी जाधव हे नाव मराठी कलाविश्वासाठी नवीन नाही. आजवर उत्तम चित्रपटांची निर्मिती केलेल्या या निर्मात्याच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच ठाऊक आहे. मात्र त्याच्या पर्सनल लाइफबद्दल फार कमी जणांना माहित आहे.  अलिकडेच रवीने त्याच्या मुलाचा अंशचा सोळावा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे सध्या लॉकडाउन असल्यामुळे घरात अडकलेल्या अंशला त्याचा वाढदिवस साध्या पद्धतीनेच सेलिब्रेट करावा लागला. परंतु या वाढदिवसाला त्याला मिळालेलं गिफ्ट तो कधीही विसरु शकणार नाही.

१६ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या अंशनी कर्करोगासारख्या असाध्या आजारावर मात करत तो बरा झाला आहे. या आजारपणात मोनिष शांतीलाल सारा यांनी एकप्रकारे त्याचे प्राण वाचवले आहेत. दात्री या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मोनिष यांनी अंशला स्टेम सेल दिल्या होत्या. त्यामुळे अंशचे प्राण वाचले आहे. विशेष म्हणजे अंशला त्याच्या १६ व्या वाढदिवशी मोनिष यांच्याशी ऑनलाइन संवाद साधता आला.  दात्री ही भारतातील सर्वात मोठी ब्लड स्टेम डोनर्स रजिस्ट्री असलेली स्वयंसेवी संस्था आहे. याच संस्थेने अंश आणि मोनिष यांची ऑनलाइन भेट घडवून दिली.

article about dutch singer emma heesters
व्यक्तिवेध : एमा हिस्टर्स
canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल

अंश १४ वर्षांचा असताना त्याला अक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमेनिया (ऑल) हा आजार झाला होता. त्यावेळी त्याला स्टेम सेलची आवश्यकता होती. त्याचदरम्यान मोनिष यांनी २०१७ मध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त दात्रीमध्ये त्यांच्या स्टेम सेल दान करण्यासाठी नोंदणी केली होती  त्यांच्या याच स्टेम सेल अंशला देण्यात आल्या.  विशेष म्हणजे या कालावधीमध्ये अंश आणि मोनिष एकमेकांना कधीच भेटले नव्हते. मात्र दात्रीने अंशच्या वाढदिवशी या दोघांची ऑनलाइन भेट घडवून आणली.

देवानं मला कोणाला तरी वाचवण्यासाठी निवडलं असावं. एखाद्याला मरणापासून वाचवणं यापेक्षा अमूल्य दूसरं काहीच असू शकत नाही. सुरुवातीला मी घाबरलो होतो. स्टेम सेल देणं म्हणजे अवघड काहीतरी असेल अशी भीती वाटायची. पण दात्रीकडून मला सर्व प्रक्रिया व्यवस्थित समजावण्यात आली. त्यामुळे मला विश्वास वाटला आणि पत्नीच्या पाठिंब्यानं मी पुढचं पाऊल टाकलं. आज अंशला पाहून खूप आनंद झाला. माझा थोडा वेळ देऊन मी एक जगणं वाचवलं. दात्रीच्या स्वयंसेवकांचा विशेषतः वर्षा आणि देव यांचे मला आभार मानावेसे वाटतात. मी दान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर माझी खूप काळजी घेतली गेली, अशी भावना मोनिष यांनी व्यक्त केली.

दरम्यान, रजिस्ट्री प्रोटोकॉलनुसार दाता आणि रुग्ण यांची एक वर्ष ओळख करून दिली जात नाही. मात्र एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर दात्रीनं त्यांची ऑनलाईन भेट घडवून आणली.  बेंगळुरूच्या मजुमदार शो कॅन्सर सेंटरच्या पेप्टियाट्रिक हेमेटॉलॉजी, ऑन्कोलॉजी आणि बोनमॅरो ट्रान्सप्लांट विभागाचे प्रमुख डॉ. सुनील भट्ट या ऑनलाईन भेटीत सहभागी झाले होते. ‘रुग्ण आणि दाता यांची ऑनलाईन भेट भारतात पहिल्यांदाच झाली आहे. सदात्रीकडे महाराष्ट्रातून केवळ ४१ हजार ४२७ जणांनीच आतापर्यंत ब्लड स्टेम सेल दान करण्यासाठी नोंदणी केली आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या फारच छोटी आहे. ब्लड स्टेम सेल दान करून रुग्णांना वाचवण्यासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन नोंदणी करणं आवश्यक आहे. या बाबत आणखी जागृती होणं गरजेचं आहे.