X
X

…म्हणून संजय जाधव आहे सईचा ‘लकी चार्म’

संजय पहिल्यांदाच सईच्या कोल्हापुरी मावळ्यांची मॅच पहायला आला होता.

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि चित्रपट दिग्दर्शक संजय जाधव ही जोडी एकत्र आली की चित्रपट सुपरहिट होणारच असा विश्वास चित्रपटसृष्टीमध्ये साऱ्यांनाच आहे. चित्रपटसृष्टीत हिट ठरणारी जोडी खेळाच्या मैदानातही हिट ठरत आहे. सध्या सुरु असलेल्या कुस्ती दंगलमध्येही जोडी एकत्र झळकली असून संजय जाधव म्हणजे लकी चार्म असल्याचं सईने म्हटलं आहे.

संजय जाधवसह सई ताम्हणकरची संपूर्ण टीम बालेवाडीमध्ये कोल्हापूर मावळे विरूध्द वीर मराठवाडा मॅचसाठी उपस्थित होती. यावेळी सईच्या कोल्हापूर मावेळ टीमने ४-२ अशा गुणांसह घवघवीत यश मिळावलं. गेल्या काही दिवसांमधल्या मॅचेसमध्ये सोमवारी झालेली कोल्हापूर मावळेची लढत सर्वाधिक चुरशीची होती. यात टीम जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि तिने संजय दादा माझा लकी चार्म असल्याचं म्हटलं आहे.

आजपर्यंत कुस्ती दंगलमध्ये झालेल्या सर्व लढतींपैकी सोमवारची लढत ही सर्वाधिक चुरशीची आणि मनोरंजक लढत होती. शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या टीमच्या कुस्तीवीरांनी समोरच्या खेळाडूला मात देऊन यश मिळवलं. संजयदादा पहिल्यांदाच मॅच पाहायला आला. आणि आम्ही मॅच जिंकलो. मी नेहमी म्हणते, दादा माझा लकीचार्म आहे. आणि ते पुन्हा एकदा सिध्द झालं, असं सई म्हणाली.

दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफूल असणाऱ्या सईने अभिनयानंतर तिचा मोर्चा क्रीडा क्षेत्राकडे वळविला आहे.तिने ‘महाराष्ट्र कुस्ती दंगल’ या कुस्ती लीगमध्ये कोल्हापुरी मावळे ही टीम विकत घेतली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने कुस्तीचा संघ विकत घेतला आहे.

23

Just Now!
X