छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिशा परमार बिग बॉस १४मधील स्पर्धक राहूल वैद्यमुळे चर्चेत आहे. शोमध्ये एजाज खानने एका भागामध्ये राहूलला महिलांचा अनादर करतो असे म्हणत सुनावले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी राहुलची गर्लफ्रेंड दिशा परमारला ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण दिशा देखील शांत बसली नाही. तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
बिग बॉसच्या घरातील राहुलचे वागणेपाहून नेटकऱ्यांनी दिशाला राहूलशी ब्रेकअप करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ट्रोलर्सला उत्तर देत दिशा म्हणाली, “तुम्ही माझे हितचिंतक नाहीत…म्हणून तुमचे विचार तुमच्यापर्यंतच ठेवा. मी माझे स्वतःचे निर्णय घेऊ शकते!” अशा आशयाच ट्विट दिशाने केल होते. पण काही वेळातच दिशाने तिचे ट्विट डिलिट केले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, राहूलने दिशाला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी बिग बॉसच्या घरातून नॅशनल टेलीव्हिजनवर लग्नासाठी प्रपोज केल होत. त्यावर दिशाने मी राहुलला उत्तर दिले आहे असे म्हटले. दिशा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशाची छोट्या पडद्यावरील ‘प्यार का दर्द है, मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेतील पंखूडीची भूमिका चांगलीच गाजली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 6, 2020 8:14 pm