31 October 2020

News Flash

“मला ग्लॅमरस म्हणू नका मी टॉमबॉय आहे”; ‘मोस्ट डिजायरेबल वुमन’ची चाहत्यांना विनंती

कतरिना कैफ, दीपिका पदुकोण यांना मागे सोडत ही अभिनेत्री ठरली 'मोस्ट डिजायरेबल वुमन'

आपल्या मादक अदांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. दिशाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आलिया भट्ट, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण यांसारख्या नामांकित अभिनेत्रींना मागे सोडत दिशा २०१९ मधील ‘मोस्ट डिजायरेबल वुमन’ ठरली आहे.

या १० अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारली नागिन; तुमची फेव्हरेट कोण?

दिशाने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. “चाहत्यांनी माझ्या प्रती जे प्रेम व्यक्त केलं त्यासाठी मी आभारी आहे. माझ्यासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे. तुम्ही मला ग्लॅमरस म्हणता पण आजही मी एक टॉमबॉयचं आहे.” असं म्हणत दिशाने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. दिशाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी दिशावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

रस्त्यावरील चहावाला ते सुपरमॉडेल; एका फोटोमुळे रातोरात सुपरस्टार झालेले ‘सात’ कलाकार

ई टाईम्सने भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींचं एक ऑनलाईन सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात सुमन राव, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, वर्तिका सिंह, कियारा आडवाणी, श्रद्धा कपूर, यामी गौतम, अदिती राव हैदरी, जॅकलीन फर्नांडिस, शिवानी जाधव, आलिया भट्ट, तारा सुतारिया, गायित्री भारद्वज अशा तब्बल २०० पेक्षा अधिक अभिनेत्री होत्या. या सर्वेक्षणात चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या आवडत्या अभिनेत्रीला वोट केलं. यामध्ये सर्वाधिक मतं अभिनेत्री दिशा पटानीला मिळाली. त्यामुळे २०१९ मधील ती ‘मोस्ट डिजायरेबल वुमन’ ठरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 1:14 pm

Web Title: disha patani 50 most desirable women 2019 list mppg 94
Next Stories
1 ‘बिग बॉस १४’साठी सलमान घेणार इतके मानधन?
2 ‘रिया एक मोहरा आहे. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार….’, बॉलिवूड दिग्दर्शकाचे खळबळजनक ट्विट
3 “शूटिंगला परवानगी देण्यापूर्वी कलाकारांची ड्रग्स टेस्ट करा”; कंगना रणौतची केंद्राला विनंती
Just Now!
X