16 November 2019

News Flash

आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना दिशा म्हणते…

एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘बागी २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या दिशासोबत यापूर्वीदेखील आदित्य ठाकरे एका डिनरसाठी गेले होते.

बॉलिवूडमधील कलाकरांना जितकी प्रसिद्धी मिळते तितकंच त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. नुकतंच अभिनेत्री दिशा पटानीला आदित्य ठाकरेंसोबत पाहण्यात आले होते. या गोष्टीमुळे दिशाला भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या ट्रोलिंगमध्ये मुख्यतः टायगर श्रॉफचा उल्लेख होता. ‘एक था टायगर’पासून ते ‘टायगर जिंदा है’ अशा अनेक कंमेंट्स नेटकाऱ्यांनी केल्या आहेत. या सगळ्या ट्रोलिंगला दिशाने नीट उत्तर दिलं आहे.

दिशाने चाहत्यांच्या या प्रश्नांना योग्य उत्तर दिलं आहे. ती म्हणाली की, “मित्र जेवणासाठी एकत्र जाऊ शकत नाहीत का? मैत्री करताना आपण मैत्री करताना आपण स्त्री अथवा पुरुष असा विचार करत नाही. माझ्या फक्त मैत्रिणीच नाही तर मित्रही आहेत. प्रत्येकालाच मित्र व मैत्रिणीही असतात.” दिशा असंही म्हणाली की, मी असं करियर निवडलं आहे की जिथे मी कायम लोकांच्या नजरेत राहणार आहे. लोक नेहमी माझ्याबद्दल मतं बनवणारच आहेत. त्यामुळे मी त्याकडे फारसे लक्ष देत नाही.”

मुंबईतील एका हॉटेलबाहेर आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा अभिनेत्री दिशा पटानीसोबत स्पॉट करण्यात आलं होतं. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘बागी २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या दिशासोबत यापूर्वीदेखील आदित्य ठाकरे एका डिनरसाठी गेले होते. त्यावेळी त्यांची प्रचंड चर्चा झाली होती. दिशाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ या चित्रपटामध्ये झळकली होती. या चित्रपटामध्ये तिने एक महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली आहे.

First Published on June 13, 2019 9:41 am

Web Title: disha patani aditya thackrey trolling djj 97