02 March 2021

News Flash

टायगर-दिशा विभक्त होणार

टायगर त्याच्या आगामी 'स्टुडंट ऑफ दी इयर २' च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.

‘बेफिक्रे’ या म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र झळकलेली अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफची जोडी बॉलिवूडमधील चर्चित जोडप्यांपैकी एक आहे. या म्युझिक अल्बमनंतर या जोडीने ‘बागी २’ मध्ये देखील स्क्रिन शेअर केली होती. तेव्हापासून या जोडीची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे सध्या या दोघांच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे त्यांची चर्चा पाहायला मिळत आहे.

‘टाईम्स नाऊ’नुसार, गेल्या काही दिवसापासून टायगर आणि दिशामध्ये वादविवाद सुरु आहेत. त्यामुळेच या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नवोदित अभिनेत्री तारा सुतारियामुळे या दोघांच्या नात्यात दुरावा  आल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या टायगर त्याच्या आगामी ‘स्टुडंट ऑफ दी इयर २’ च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये नवोदित अभिनेत्री तारा सुतारिया टायगरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रीकरणावेळी टायगर आणि तारा यांच्यातील जवळीक वाढल्यामुळे दिशाने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या दिशा आणि टायगर या दोघांकडे अनेक प्रोजेक्ट असून या दोघांनीही आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. दिशा लवकरच सलमानच्या ‘भारत’ चित्रपटामध्ये झळकणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असून यात दिशा सर्कस ट्रपॅजीच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 3:14 pm

Web Title: disha patani and tiger shroff breakup
Next Stories
1 ‘लूडो खेलूंगी’ वर थिरकणाऱ्या नेहाचा व्हिडिओ व्हायरल
2 जुलैपासून बेपत्ता असलेल्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीला ९५१ कोटींचा दंड
3 Video : भावनाविवश करणारं ‘नैन न जोडी’ एकदा पाहाच
Just Now!
X